विंदा करंदीकर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज मंगळवार, मार्च १४, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर फाल्गुन २३, शके १९४४
सूर्योदय : ०६:४८ सूर्यास्त : १८:४८
चंद्रोदय : ०१:०७, मार्च १५ चंद्रास्त : ११:१७
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
उत्तरायण
ऋतू : शिशिर
चंद्र माह : फाल्गुन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : सप्तमी – २०:२२ पर्यंत
नक्षत्र : अनुराधा – ०८:१३ पर्यंत
योग : वज्र – १५:१४ पर्यंत
करण : विष्टि – ०८:५८ पर्यंत
द्वितीय करण : बव – २०:२२ पर्यंत
सूर्य राशि : कुंभ – ०६:४७, मार्च १५ पर्यंत
चंद्र राशि : वृश्चिक
राहुकाल : १५:४८ ते १७:१८
गुलिक काल : १२:४८ ते १४:१८
यमगण्ड : ०९:४८ ते ११:१८
अभिजित मुहूर्त : १२:२४ ते १३:१२
दुर्मुहूर्त : ०९:१२ ते १०:००
दुर्मुहूर्त : २३:३५ ते ००:२३, मार्च १५
अमृत काल : २३:०० ते ००:३३, मार्च १५
वर्ज्य : १३:४० ते १५:१३

माझी न घाई कांहिही, जाणून आहे अंतरी,
लागेल जन्मावें पुन्हा नेण्या तुला मझ्या घरी.

तू झुंजुमुंजू हासशी, जाईजुईचे लाजशी;
मी वेंधळा मग सांडतॉ थोडा चहा बाहीवरी.

तू बोलतां साधेसुधें सुचवुन जाशी केवढे,
मी बोलतो वाचाळसा अन् पंडीती काहीतरी.

होशी फुलासह फूल तू अन् चांदण्यासह चांदणे,
ते पाहणे, इतकेंच मी बघ मानलें माझ्या करी.

म्हणतेस तू, “मज आवडे रांगडा सीधेपणा!”
विश्वास मी ठेवू कसा या हुन्नरी शब्दांवरीं.

लिहिती बटा भालावरी ऊर्दु लिपींतिल अक्षरें;
हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी.
कवी – विंदा करंदीकर

हे मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले.

त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम त्यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाकडे सुपूर्द केली होती. या रकमेच्या व्याजातून दरवर्षी ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावे अन्य भाषेतून मराठीमध्ये अनुवादित झालेल्या पुस्तकाला पुरस्कार द्यावा असे त्यांनी सुचविले होते.

• २०१०: ज्ञानपीठ विजेते लेखक आणि कवी विंदा करंदीकर यांचे निधन. (जन्म: २३ ऑगस्ट, १९१८)

हा ठोकरून गेला,तो ठोकरून गेला

जो भेटला मला तो वांधा करून गेला

वेशीवरी मनाच्या आले सवाल सारे
माझा सवाल माझ्या ओठी विरून गेला

माझ्याविना फुलांची दिंडी निघून गेली
काटाच प्यार आता जो मोहरून गेला…

चाहूल ही तुझी की ही हूल चांदण्याची
जो चंद्र पाहिला मी तो ही दुरून गेला

आजन्म ही तुझी मी केल्यावरी प्रतीक्षा
माझाच भास माझ्या अंगावरून गेला..

गझल – सुरेश भट
• २००३: कविवर्य आणि श्रेष्ठ गझलकार सुरेश भट यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल, १९३२)

घटना :
१९३१: पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबई मध्ये प्रदर्शित झाला.
१९५४: दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.
१९६७: अमेरीकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे पार्थिव आर्लिंग्टन राष्ट्रीय दफनभूमी येथे हलविण्यात आले.
२०००: कलकत्ता येथील टेक्निशियन आय हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
२००१: सिक्कीममधील आदिवासी समाजातील चोकीला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव म्हणून सूत्रे हाती घेतली.
२००१: व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने ईडन गार्डन वर नाबाद २७५ धावा काढून या मैदानावरील सर्वोच्च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात ४४ चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली.
२०१०: ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार पुण्यात देण्यात आला.

• मृत्यू :
• १९९८: अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक दादा कोंडके यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट, १९३२)

जन्म :
१९३१: ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी २०११)
१९७४: पार्श्वागायिका साधना घाणेकर उर्फ साधना सरगम यांचा जन्म.
१९७२: भारतीय कवी इरोम चानू शर्मिला यांचा जन्म.
१९७४: भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर रोहित शेट्टी यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »