हक्कभंग समितीचा अध्यक्ष झाल्यानंतरच आरोप : कुल

आवडल्यास ही बातमी शेअर करा

चौकशीला सामोरे जाण्यास सज्ज

पुणे : भीमा पाटस साखर कारखान्यावर खासदार संजय राऊत यांनी केलेला आरोप हा राजकीय आकसातून केला आहे, असा खुलासा करताना, ‘कारखान्यासंदर्भात होणाऱ्या कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास सज्ज आहोत’, असे आमदार राहुल कुल यांनी म्हटले आहे.

खा. राऊत यांच्या आरोपांना आ. कुल यांनी एक पत्रक काढून उत्तर दिले आहे. त्यात ते म्हणतात, मी २२ वर्षांपासून कारखान्याचा चेअरमन आहे. माझी हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरच हा नेमका आरोप का झाला, असा सवाल आहे.

खासदार राऊत यांना कारखान्याबाबत पूर्ण माहिती नाही. माझे राजकीय विरोधक असणाऱ्या तालुक्यातील काही अल्प संतुष्ट लोकांनी चुकीची माहिती दिली. अपुऱ्या माहितीच्या आधारे त्यांनी कारखान्यावर आरोप केलेले आहेत.

माझी वैयक्तिक मालमत्ता ही बँकांकडे गहाण ठेवून पैसे उपलब्ध करून कारखाना चालवला आहे. कारखाना चालवण्यासाठी वैयक्तिक मालमत्ता गहाण ठेवणारा कदाचित मी राज्यातील पहिला चेअरमन असेल, अशी वस्तुस्थिती असताना केवळ राजकीय आकस मनात ठेवून खासदार राऊत हे आरोप करीत आहेत.

यापूर्वी विरोधकांनी कारखान्याच्या भ्रष्टाचार संदर्भात वेळोवेळी चौकशी केली. त्यांच्या हाती काहीच न लागल्याची वस्तुस्थिती आहे. ३ वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर या वर्षी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून हा कारखाना सुरू झाला. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये भीमा पाटस कारखान्याची साखरेची रिकव्हरी सर्वाधिक असल्याने सभासदांना सर्वाधिक दर मिळणार आहे, असे कूल यांनी पत्रकात म्हटले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »