‘सहकार शिरोमणी’ची निवडणूक जाहीर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सोलापूर : भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची (चंद्रभागा नगर) पंचवार्षिक निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. २१ संचालक निवडण्यासाठी ही निवडणूक होत आहे.
पंढरपूर येथील प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयात १८ मे पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. १९ मे रोजी अर्जाची छाननी करण्यात येईल.


निवडणूक कार्यक्रम

  • १२ ते १८ अर्ज दाखल करणे
  • १९ मे अर्ज छाननी
  • २३ मे ते ६ जून अर्ज माघारी
  • ७ जून चिन्ह वाटप
  • १६ जून मतदान
  • १७ जून मतमोजणी

कल्याणराव काळे यांची सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यावर गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता असल्याने ही निवडणूक त्यांच्या प्रतिष्ठेची असणार आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील त्यांनी सहकार शिरोमणीच्या निवडणुकीच्या मैदानात उतरुन कल्याणराव काळे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »