१३६ साखर कारखान्यांकडून एफआरपीची शंभर टक्के रक्कम अदा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

६४ कारखान्यांकडे  ३८७ कोटी थकित

पुणे : हंगामातील २०० पैकी १३६ साखर कारखान्यांनी एफआरपीची शंभर टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे, तर काही कारखान्यांनी एफआरपीच्या रक्कमेपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिल्याचेही माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांकडून मिळाली आहे. ८० ते ९९ टक्के रक्कम ५८ कारखान्यांना दिलेली आहे. तर ६० ते ७९ टक्के ४ कारखाने आणि शून्य ते ५९ टक्के रक्कम २ कारखान्यांनी दिलेली आहे.

राज्यातील एकूण ६४ कारखान्यांकडे अद्याप हंगाम २०२४-२५ मधील शेतकऱ्यांची तब्बल ३८७ कोटी रुपयांची एफआरपीची रक्कम देणे बाकी असल्याचे आयुक्तालयाच्या जुलैअखेरच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यंदाच्या हंगामात २०० कारखान्यांनी मिळून ८५४ लाख ९७ हजार मेट्रिक टनाइतके ऊस गाळप पूर्ण केले.  दरम्यान, साखर आयुक्तालयाने एफआरपीची अधिक रक्कम थकीत असलेल्या कारखान्यांच्या वेळोवेळी सुनावण्या घेतल्या असूनसुद्धा शेतकऱ्यांची रक्कम थकीत ठेवलेल्या २८ साखर कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाण-पत्रानुसार (आरआरसी) जप्तीची कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »