६४ कारखान्यांकडे ३८७ कोटींची एफआरपी थकबाकी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे: महाराष्ट्र राज्य साखर आयुक्तालयाने ३१ जुलै २०२५ पर्यंतच्या आकडेवारीवर आधारित प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, शेतकऱ्यांची एकूण ३८७ कोटी रुपयांची एफआरपी थकबाकी असून, ६४ साखर कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांचे संपूर्ण पैसे दिलेले नाहीत.

एकूण एफआरपी थकबाकी आणि थकबाकीदार कारखाने:

साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार, २०२४-२५ च्या गाळप हंगामात ३१ जुलै २०२५ पर्यंत एकूण ३८७ कोटी रुपये एफआरपी थकबाकी आहे. यामध्ये वाहतूक आणि तोडणी खर्चासह (H&T) एकूण देय एफआरपी ३१६०२ कोटी रुपये होती, ज्यापैकी ३१२१५ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. राज्यातील एकूण २०० साखर कारखान्यांपैकी, ६४ कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी थकवून ठेवली आहे .

दोनशे पैकी ४ कारखान्यांनी ६०-७९.९९% एफआरपी दिली आहे, तर २ कारखान्यांनी ००-५९.९९% एफआरपी अदा केली आहे. उर्वरित १३६ कारखान्यांनी १००% एफआरपी दिली आहे, तर ५८ कारखान्यांनी ८०-९९.९९% एफआरपी दिली आहे.

  •  

या थकबाकीमुळे २८ कारखान्यांविरुद्ध आर.आर.सी. (Revenue Recovery Certificate) जारी करण्यात आले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »