‘अमूल’ची आता ‘ऑरगॅनिक शुगर’

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अहमदाबाद : गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचा (GCCMF) ‘अमूल’ ब्रँड सेंद्रिय साखर (ऑरगॅनिक शुगर) पुढील महिन्यापासून बाजारात आणणार आहे. त्यामुळे नव्या स्पर्धेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
आम्ही पुढील एका महिन्यात सेंद्रिय अमूल शुगर, गूळ आणि चहा लाँच करून आपला “सेंद्रिय” उत्पादनांची मालिका वाढवणार आहोत, असे ‘अमूल’ने जाहीर केले.

“आमच्या सेंद्रिय उत्पादनांच्या रेंजमध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ किंवा कडधान्यांसह 24 सेंद्रिय उत्पादने आधीच आहेत. पुढील महिन्यापासून आम्ही सेंद्रिय साखर, गूळ आणि चहा यांसारखी आणखी उत्पादने बाजारात आणणार आहोत,” असे GCMMF चे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता सांगितल्याचे वृत्त बिझनेस लाइनने दिले आहे.. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या अमूल ब्रँडने २०२२ मध्ये अमूल ऑरगॅनिक होल व्हीट आटा लाँच करून सेंद्रिय खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात प्रवेश केला.

तीन नवीन सेंद्रिय उत्पादनांच्या दरांचा तपशील न सांगता मेहता म्हणाले, “आपल्या सर्वांना रासायनिक खते आणि कीटकनाशकांशिवाय अन्न खायचे आहे. जमिनीतील कार्बनचे प्रमाण कमी होत आहे. जर आपण सेंद्रिय खायला सुरुवात केली तर शेतकऱ्यांना सेंद्रिय उत्पादन करावे लागेल आणि त्यासाठी बाजारपेठही असणे आवश्यक आहे. आम्ही उत्पादकांना सांगत आहोत की एक बाजारपेठ आहे आणि आम्ही ग्राहकांनाही त्याची माहिती देत आहोत.

अमूल भारतातील $1.3 अब्ज ऑरगॅनिक फूड मार्केट टॅप करू पाहत आहे. एका अंदाजानुसार, 2028 पर्यंत देशातील सेंद्रिय फूड मार्केटमध्ये $4.6 अब्जांपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे.

अमूल ब्रँड अंतर्गत, GCMMF आधीच सेंद्रिय चना डाळ, मसूर डाळ, तूर डाळ, संपूर्ण हिरवा मूग, राजमा, काबुली चना, संपूर्ण उडीद, देसी चना, संपूर्ण गहू आटा, बेसन, बासमती तांदूळ, सोनमसूरी तांदूळ इत्यादींची विक्री करत आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »