गीतकार अशोक परांजपे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज बुधवार, एप्रिल ९, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र १९, शके १९४७
सूर्योदय : ०६:२६ सूर्यास्त : १८:५४
चंद्रोदय१६:०५ चंद्रास्त : ०४:४७, एप्रिल १०
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : चैत्र
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : द्वादशी – २२:५५ पर्यंत
नक्षत्र : मघा – ०९:५७ पर्यंत
योग : गण्ड – १८:२६ पर्यंत
करण : बव – १०:०० पर्यंत
द्वितीय करण : बालव – २२:५५ पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : सिंह
राहुकाल : १२:४० ते १४:१४
गुलिक काल : ११:०७ ते १२:४०
यमगण्ड : ०७:५९ ते ०९:३३
अभिजितमुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:१५ ते १३:०५
अमृत काल : ०७:२१ ते ०९:०५
अमृत काल : ०५:२१, एप्रिल १० ते ०७:०७, एप्रिल १०
वर्ज्य : १८:४६ ते २०:३२

आज जागतिक कोकणी भाषा दिन आहे.

|| अवघे गर्जे पंढरपूर
चालला नामाचा गजर ||
टाळ घोष कानी येती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती
पांडुरंगी जाहलों हो, चंद्रभागा तीर, चालला नामाचा गजर || १ ||

इडापिडा टळुनी जाती, देहाला या लाभे मुक्ती
नामरंगी रंगलो हो, संतांचे माहेर, चालला नामाचा गजर || २ ||

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई
सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर || ३ ||

  • गीतकार अशोक जी. परांजपे

२००९: केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर, अवघे गरजे पंढरपूर, कैवल्याच्या चांदण्याला, नाविका रे वारा वाहे रे, ही आणि इतर अनेक प्रसिद्ध मराठी गाणी लोकप्रिय करणारे लोककलांचे अभ्यासक आणि गीतकार अशोकजी परांजपे यांचे निधन. (जन्म: ३० मार्च , १९४१ )

बौद्धधर्माचे भाष्यकार – राहुल सांकृत्यायन यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे कार्य, यांचा थोडक्यात आढावा घेणे ही फारच अवघड गोष्ट आहे. हिंदी भाषेत त्यांच्या आत्मचरित्राचे पाच खंड आहेत. त्यांचे मूळ नाव केदारनाथ पांडे तथा दामोदर स्वामी.( गोत्र सांकृत्य असल्याने सांकृत्यायन असे उपनाम त्यांनी घेतले होते.) त्यांना राहुलबाबाही म्हणत.

१९३० साली लंकेत बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर राहुल सांकृत्यायन असे नाव त्यांनी धारण केले. उत्तर प्रदेशात आझमगड जिल्ह्यातील पन्दहा नावाच्या गावात नऊ एप्रिल १८९३ला त्यांचा जन्म झाला. कर्मभूमी मात्र बिहार होती. त्यांनी अफाट साहित्यनिर्मिती केली, प्रचंड प्रवास केला. तिबेट आणि रशियातील त्यांचे वास्तव्य लेखन-संशोधनदृष्ट्या महत्त्वाचे ठरले. त्यांना यात्रा-साहित्याचे जनक मानले जाते. विश्व-दर्शनशास्त्र आणि बौद्ध धर्मावरील त्यांचे निबंध जगविख्यात आहेत.

सांकृत्यायन यांचे सर्वांत महत्त्वाचे, अनमोल कार्य म्हणजे तिबेट आणि चीनच्या प्रवासात मिळालेले आपलेच हजारो भारतीय ग्रंथ त्यांनी प्राप्त केले. ज्यांच्या प्रती उपलब्ध नव्हत्या, ते ग्रंथ लिहून काढले आणि भारतात आणले. तिबेटहून तर शेकडो याक प्राण्यांच्या पाठीवरून, डोंगर-पर्वतांमधून दुस्तर मार्ग काढत आपले ग्रंथधन देशाला अर्पण केले. पुढे त्यांचे संपादन, प्रकाशन झाले. सध्या ते सगळे ग्रंथ पाटणा येथील सुप्रसिद्ध ग्रंथालयात सुरक्षित आहेत. त्यामुळेच भारताची ज्ञान-परंपरा साऱ्या जगाला समजली. खऱ्या अर्थाने राहुलजी ‘भारतरत्न’ ठरले. त्यांचे वक्तृत्व अद्भुत होते. शब्दसामर्थ्य आणि प्रवाही अभिव्यक्तीमुळे श्रोते संमोहित होत असत.

त्यांचे साहित्यिक योगदान असे आहे. ‘मेरी जीवनयात्रा’ या नावाने त्यांचे पाच खंडांमधील आत्मकथन आहे. सतमीके बच्चे, वोल्गा ते गंगा, बहुरंगी वसुंधरा, कनैला की कथा हे कथासंग्रह आहेत. बाईसवी सदी, सिंह सेनापती, मधुर स्वप्न, दिवोदास आदी नऊ कादंबऱ्या आणि तीन अनुवाद त्यांनी केलेले आहेत. चरित्रलेखनात स्टॅलिन, सरदार पृथ्वीसिंह, कार्ल मार्क्स, माओत्सेतुंग इत्यादी १६ ग्रंथ आहेत. त्यांचे यात्रासाहित्य विशेष उल्लेखनीय म्हणावे लागेल. लंका, जपान, इराण, किन्नर देश, लडाख, तिबेट अशी १० देशांची प्रवासवर्णने त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी तिबेटमध्ये सव्वा वर्ष आणि रशियात २५ महिने मुक्काम केला होता. त्यामुळे त्यांचे वर्णन आणि तिथे केलेले काम महत्त्वाचे ठरते.

ऋग्वेदिक आर्य, दर्शन-दिग्दर्शन, मध्य आशियाचा इतिहास असे त्यांचे निबंध जगभरात गाजले. तीस भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. प्रखर राष्ट्रभक्त, भारतविद्, इतिहासकार, दर्शनशास्त्री आणि भाषाज्ञानी म्हणून ते मान्यता पावले.

तरुण वयात त्यांचा सामाजिक कार्यात मोठा सहभाग असे. स्वातंत्र्यासाठी केलेल्या सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे त्यांना दीर्घ काळ तुरुंगवासही भोगावा लागला. बक्सर तुरुंगात सहा महिने घालवल्यावर ते जिल्हा काँग्रेसचे मंत्री झाले. नंतर दीड महिना नेपाळमध्ये जाऊन राहिले. पुढे हजारीबाग तुरुंगात काही काळ काढला. राजकारणाचा कंटाळा आला, म्हणून त्यांनी हिमालयात वास्तव्य केले. लंकेत त्यांनी १९ महिने भरपूर प्रवास केला (१९२७). तशा त्यांच्या लंका यात्रा बऱ्याच वेळा झाल्या. १९३२-३३मध्ये इंग्लंड व युरोपची सफर घडली. लडाख आणि तिबेटला ते दोन-दोनदा गेले. पुढे तिबेटला आणखी दोन वेळा गेले. जपान, कोरिया, मांचुरिया, रशिया (दोनदा), इराण या देशांच्या यात्रा १९३८पर्यंत झाल्या.

किसान आंदोलनात त्यांचा सहा वर्षे सहभाग राहिला. त्यात सत्याग्रह आणि उपोषण ही ‘शस्त्रे’ होती. ते साम्यवादाचे समर्थक होते. कम्युनिस्ट पार्टीचे सदस्यही बनले. सन १९४०-४२दरम्यान पुन्हा २० महिन्यांचा तुरुंगवास घडला. नंतर रशिया, चीन आणि लंकेच्या यात्रा झाल्या. प्राचीन आणि अर्वाचीन संस्कृतींचा अभ्यास, तसेच देशादेशांमध्ये प्रत्यक्ष हिंडून तिथली माहिती घेणे हाच त्यांचा ध्यास होता. त्यांचे साहित्य त्यामुळेच सकस आणि परिपूर्ण झाले.

त्यांच्या एकूण पुस्तकांची संख्या १४० आहे. शाळेत कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता त्यांना ‘महापंडित’ ही पदवी मिळाली. रशियन विद्यापीठात त्यांनी ‘इंडॉलॉजी’ (भारतीय विद्या) या विषयाचे अध्यापन केले. लंकेतही त्यांना प्राध्यापक म्हणून सन्मानाने बोलावण्यात आले. अशा महान व्यक्ती हयात असताना त्यांच्या कार्याची योग्य दखल घेतली जात नाही, किंबहुना उपेक्षाच केली जाते. तीच गोष्ट राहुल सांकृत्यायन यांच्या बाबतीत घडली. त्यांचे जीवन म्हणजे सत्याचा अखंड शोध, नित्यनूतन ज्ञानग्रहण आणि त्याग अशी एक यात्राच होती.

सन १९५८मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार आणि १९६३ मध्ये पद्मभूषण असे श्रेष्ठ सन्मान त्यांनी प्राप्त केले.त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त १९९३ साली एक रुपयाचे टपाल तिकीट काढण्यात आले.

१८९३: बौद्धधर्माचे भाष्यकार आणि इतिहासकार पद्मभूषण पुरस्कार सन्मानित राहुल सांकृत्यायन यांचा जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल, १९६३)

  • घटना :
    १८६७: रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत एक मताने मंजुरी मिळाली.
    १९४०: दुसरे महायुद्ध – जर्मनीने नॉर्वे व डेन्मार्क पादाक्रांत केले.
    १९६७: बोइंग-७६७ या विमानाने पहिले उड्डाण केले.
    १९९४: सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

• मृत्यू :
• १९९४: स्वातंत्र्यसैनिक, तेलंगणच्या लढ्याचे प्रवर्तक तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस चंद्र राजेश्वर राव यांचे निधन. (जन्म:६ जून , १९१४)
• १९९८: महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते यांचे निधन. ( जन्म: २२ जून , १९०८ )
• २००१: दलित साहित्यिक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू शंकरराव खरात यांचे निधन. ( जन्म: ११ जुलै , १९२१ )
• २००९: हिंदी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक निर्माते शक्ती सामंत यांचे निधन. ( जन्म: १३ जानेवारी, १९२६ )

  • जन्म :

१८२८: समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म. ( मृत्यू: २५ जुलै, १८८० )
१८८७: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक विष्णू गंगाधर तथा दादासाहेब केतकर यांचा जन्म. ( मृत्यू: १९ ऑक्टोबर, १९५० )
१९४८: हिंदी चित्रपट अभिनेत्री जया भादुरी यांचा जन्म.
१९६५ : नालंदा नृत्यकला महाविद्यालयाची गोल्ड मेडलिस्ट, भरतनाट्य नृत्यकलावंत डॉ. स्वाती दैठणकर यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »