आज बैल पोळा
आज सोमवार, सप्टेंबर २, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर भाद्रपद दिनांक ११, शके १९४६
*आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:२४ सूर्यास्त : १८:५२
चंद्रोदयचंद्रोदय नहीं चंद्रास्त१८:३७
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माहश्रावण
आठवड्याचा दिवस
सोमवार
पक्ष कृष्ण पक्ष
तिथिअमावस्या – पूर्ण रात्रि पर्यंत
नक्षत्रमघा – ००:२०, सप्टेंबर ०३ पर्यंत
योगशिव – १८:२० पर्यंत
करणचतुष्पाद – १८:२० पर्यंत
द्वितीय करणनाग – पूर्ण रात्रि पर्यंत
सूर्य राशिसिंह
चंद्र राशिसिंह
राहुकाल०७:५७ ते ०९:३१
गुलिक काल१४:११ ते १५:४५
यमगण्ड११:०४ ते १२:३८
अभिजितमुहूर्त१२:१३ ते १३:०३
दुर्मुहूर्त१३:०३ ते १३:५३
दुर्मुहूर्त१५:३२ ते १६:२२
अमृत काल२१:४१ ते २३:२७
वर्ज्य११:०४ ते १२:५०
मराठी मातृदिनाच्या दिवशी माता , पिठोरी अमावस्येचे व्रत करतात. त्या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी आठ कलशांवर आठ मातृका (देवीची रूपे) ठेऊन त्यांची आणि चौसष्ठ योगिनींची पूजा करतात आणि आपले सौभाग्य आणि विशेषतः मुलांसाठी आयुरारोग्य, सुखसंपत्ती वगैरे मागून त्यांच्यासाठी प्रार्थना करतात. व्रतासाठी केलेले पक्वान्न म्हणजे बहुधा पु-या डोक्यावर घेऊन “कोण अतिथी आहे काय?’ असे विचारतात. एकेक मुलांनी मागून येऊन उत्तर द्यायचे. “मी आहे.” आणि एक पुरी घ्यायची. अखेर आईने त्या सगळ्या मुलांना पक्वान्ने खायला घालायची. पूर्वी पूजेच्या मूर्ती पिठाच्या करीत, सध्या तशी चित्रे मिळतात. या दिवशी नैवेद्यासाठी सगळी पिठाची पक्वान्ने बनवतात म्हणून या दिवसाला “पिठोरी अमावस्या’ असे नाव पडले असणार.
आज पिठोरी अमावस्या / मातृदिन आहे.
बैल पोळा – शेतकरी लोकांचा हा एक सणच असतो. शेतकऱ्यांचा महत्वाचा साथीदार बैल. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा-राजाचा पारंपरिक सण म्हणजे ‘पोळा ‘
आज बैल पोळा आहे.
आज आंतरराष्ट्रीय नारळ दिन आहे.
कुळीं कन्या पुत्र, होती जे सात्विक |
तयाचा हरिख, वाटे देवा |
पहाताती वाट, स्वर्गीचे पूर्वज|
वंशी भक्तराज, व्हावा कोणी ||
पुत्र नसलिया, कन्या तरी व्हावी |
हरीगुण गाई सर्वकाळ |
तुका म्हणे पितरे, आशिर्वाद देती |
कल्याण इच्छिती, निरंतर ||
कलावती आई बेळगाव – परमार्थात कलावती आईंनी नियमित उपासनेला महत्व व दिलेले आहे. आपला जठराग्नी विशिष्ट वेळेला जेवणाची वाट बघतो, निद्रा देवी जशी विशिष्ट वेळेला येते त्याप्रमाणे श्रीहरी देखील आपली वाट बघत असतो म्हणून नियमित आणि विशिष्ट वेळेच्या उपासनेचे आणि सामूहिक उपासनेचे महत्त्व विशेष असते हे पटवून दिले.
कलावती आई बेळगाव , आज जन्मदिन आहे. ( दिनांकानुसार )
( परमपूज्य आईंनी ०८ *फेब्रुवारी १९७८ म्हणजे माघ शुद्ध प्रतिपदेला महासमाधी घेतली.
मराठी साहित्याच्या अभिवृद्धीसाठी अखंडपणे कार्यरत असलेले एक श्रेष्ठ समर्पित साहित्यिक वि. स. खांडेकर –
शब्द प्रभुत्व, कल्पनावैभव, कोटी बाजपणा, वास्तववादी, व्यामिश्र आणि प्रयोगशील लेखन करणारे महाराष्ट्रातले श्रेष्ठ कादंबरीकार लेखक विष्णू सखाराम खांडेकर म्हणजेच वि. स. खांडेकर.
खांडेकरांचे लेखन बहुविध स्वरूपाचे असून त्यात १५ कादंबऱ्या, ३१ लघुकथासंग्रह, १० लघुनिबंधसंग्रह, ६ रूपककथासंग्रह, १ नाटक ह्यांशिवाय काही चरित्रात्मक / समीक्षात्मक ग्रंथ व संकीर्ण लेखसंग्रह ह्यांचा समावेश होतो. तसेच त्यांनी मराठी, हिंदी व तेलुगू चित्रपटांसाठी एकूण १८ पटकथा लिहिलेल्या आहेत.
१९६१ मध्ये त्यांच्या ययाति ह्या कादंबरीस महाराष्ट्र सरकारने कादंबरी विभागाचे पहिले पारितोषिक दिले. ह्या कादंबरीस ह्याच वर्षी साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले. ह्या कादंबरीत आधुनिक जीवनाला ग्रासून टाकणाऱ्या भोगवादावरील भेदक भाष्य आढळते.
१९७४ साली “ज्ञानपीठ” पुरस्काराने त्यांच्या साहित्य सेवेचा गौरव करण्यात आला तर १९६८ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला.
• १९७६: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कादंबरीकार वि. स. खांडेकर यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी , १८९८)
वनस्पतीतज्ञ डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर – वडिलांच्या बदल्यांमुळे आघारकरांचे शालेय शिक्षण ५-६ ठिकाणी झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. वनस्पतीशास्त्र व प्राणिशास्त्र विषय घेऊन ते बी.ए.ची परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. १९०७ साली ते मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजात वनस्पतीशास्त्र शिकवत. पुढे ते एम.ए. झाले.
आघाराकरांना वनस्पती आणि प्राण्यांचे नमुने गोळा करण्याची आवड होती. सह्याद्रीच्या डोंगरात फिरत असताना त्यांनी गोड्या पाण्यात राहणाऱ्या जलपुष्प प्राण्यांमधल्या एका नवीन जातीचा शोध लावला. हे त्यांचे संशोधन नेचर मासिकात छापून आले होते.
त्यानंतर शालेय शिक्षकाची मिळू घातलेली नोकरी नाकारून ते कोलकात्याच्या इंडियन म्यूझियममध्ये गेले.
म्यूझियममधील सिलेंटराटा विषयाच्या प्राध्यापकांनी त्यांना स्पंज जातीच्या प्राण्यांचे नमुने गोळा करायचे आणि टिकवायचे शिक्षण दिले.
सह्याद्रीतून फिरताना आघारकरांना एका नव्याच इंगळीचा शोध लागला. इंगळीच्या या जातीला क्रिप्टो हिपटास आघारकारी असे नाव दिले गेले.
आघारकरांनी दोन वर्षे जर्मनीत संशोधन केले व पीएचडी मिळवली. युरोप, इंग्लंड व नेपाळमधील दुर्मीळ वनस्पती त्यांनी त्या वेळी गोळा केल्या. हावरा येथील दुर्मीळ वनस्पतींचे नमुने लंडन येथे हलविले जाणार आहेत हे समजल्यावर त्यांनी त्याला विरोध करून ते हलवू दिले नाहीत.
आघारकरांच्या प्रयत्नाने दोन भारतीय विद्यार्थ्यांना लंडनमध्ये जाऊन अभ्यास करण्याच्या शिष्यवृत्त्या मिळू लागल्या. आघारकरांच्या विद्यार्थ्यांनी भात, ज्यूट, आंबा, केळी अशा पिकांवर संशोधन केले.
१९२४ सालच्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे आघारकर अध्यक्ष होते. त्यांच्या पुढाकाराने वाळलेल्या वनस्पतींची (हर्बेरियम) जागोजागी कायमची प्रदर्शने सुरू झाली.
आघारकर हे योजना आयोगाच्या मृदसंधारण आणि वनीकरण समितीचे अध्यक्ष होते. १९४६ साली कोलकात्याहून निवृत्त झाल्यावर ते पुण्याला आले आणि त्यांनी विज्ञानवर्धिनी संस्थेची स्थापना केली. तेथे वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, कवकशास्त्र इत्यादी विषयांवर संशोधन चालते.
ही विज्ञानवर्धिनी नावाची संस्था-MACS आता आघारकर संशोधन संस्था म्हणून ओळखली जाते. आघारकरांनी या संस्थेला आपली पुणे व मुंबई येथील सर्व स्थावर मालमत्ता देऊन टाकली.
१९६०: वनस्पतीतज्ञ, विज्ञान वर्धिनी महाराष्ट्र या संस्थेचे संचालक डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर यांचे निधन. ( जन्म : १८ नोव्हेंबर, इ.स. १८८४)
- घटना :
१९१६: पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.
१९२०: म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.
१९३९: दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
१९४५: व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
१९४६: भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
१९६०: केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
१९७० : राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.
”माझ्या मृत्युनंतरही मी माझे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी पुढील पिढीला प्रेरणा देत राहीन !” — स्वामी विवेकानंद
१९९९: भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.
• मृत्यू :
• १९९०: मराठवाड्याचा चालताबोलता इतिहास अशी ओळख असणारे लेखक न. शे. पोहनेरकर यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९०७)
• १९९९: चित्रकार व लेखक डी. डी. रेगे यांचे निधन. ( जन्म: १७ डिसेंबर १९११ – पाचल, राजापूर, रत्नागिरी )
• २००९: आंध्र प्रदेशचे १४वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी याचं विमान अपघातात निधन. (जन्म: ८ जुलै१९४९)
• २०११: संगीतकार श्रीनिवास खळे यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १९२६)
• २०१४: भारतीय वकील आणि राजकारणी गोपाल निमाजी वाहनवती यांचे निधन. (जन्म: ७ मे १९४९)
- जन्म :
१८३८: भारतीय गुरु आणि तत्वज्ञ भक्तिविनाडो ठाकूर यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुन १९१४)
१८८६: साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाजसुधारक प्रा. श्रीपाद महादेव माटे तथा श्री. म. माटे यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर , १९५७)
१९४१: चित्रपट अभिनेत्री साधना शिवदासानी ऊर्फ साधना यांचा जन्म.
१९६५: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक पार्थो सेन गुप्ता यांचा जन्म.
१९७१: भारतीय अभिनेते आणि राजकारणी पवन कल्याण यांचा जन्म.
१९८८: भारतीय क्रिकेट खेळाडू इशांत शर्मा यांचा जन्म.