काँग्रेस भवनासमोरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उपोषण

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सोलापूर : माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्याशी संबंधित असलेल्या मातोश्री साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं थकवली आहेत. यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी काँग्रेस भवनासमोरच शेतकऱ्याचं आमरण उपोषण सुरु केले आहे.

हे सर्व शेतकरी धाराशिव जिल्ह्यातून आले आहेत. मागील अनेक महिन्यांपासून ऊसाचे बिल थकीत असल्याने वेळोवेळी आंदोलन करूनही बिल दिले जातं नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे सोलापुरातील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयासामोरं आंदोलन करण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »