बजाज हिंदुस्थान शुगरच्या शेअरमध्ये ४०.५ टक्के वाढ

मुंबई : देशातील सर्वात मोठी खासगी शुगर मिल म्हणून नावलौकिक असलेल्या बजाज हिंदुस्थान शुगरच्या शेअर दरामध्ये सलग दोन सत्रांत मिळून तब्बल ४०.५5 टक्के वाढ झाली.
सोमवारच्या सत्रामध्ये १८ टक्के वाढ झाली, तर शुक्रवारी दरांमध्ये वीस टक्क्यांवर वाढ झाली होती. सोमवारचे व्यवहार बंद झाले तेव्हा, शेअर दर १५.८४ रुपयांवर होता.
आर्थिक अडचणीत असल्याने या शुगर मिलकडे लाखो गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. चालू कर्ज खात्यावर कंपनीकडे कसलीही थकबाकी नाही. बँका आणि इतर वित्तीय संस्थांचे सर्व हप्ते संपूर्णपणे भरले आहेत, अशी घोषणा कंपनीने शुक्रवारी सेबीकडे (शेअर बाजार नियामक) केल्यानंतर त्याच्या शेअर दरात अभूतपूर्व वाढ होत आहे.
बजाज हिंदुस्थान शुगर साखर, अल्कोहोल आणि वीज निर्मितीमध्ये गुंतलेली आहे.
कंपनीने Q2 FY23 मध्ये रु. 162.37 कोटींचा एकत्रित निव्वळ तोटा नोंदवला आहे, तर Q2 FY22 मध्ये रु. 113.01 कोटीचा निव्वळ तोटा झाला होता. 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत निव्वळ विक्री 1.5% YoY घसरून रु. 1,323.40 कोटी झाली. असे असताना गुंतवणूकदारांचा विश्वास मात्र वाढला आहे.






