बीजू पटनायक

आज रविवार, मार्च ५, २०२३ रोजीचे
पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर फाल्गुन १४, शके १९४४
सूर्योदय : ०६:५५ सूर्यास्त : १८:४५
चंद्रोदय : १७:०४ चंद्रास्त : ०६:१७, मार्च ०६
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
उत्तरायण
ऋतू : हेमंत
चंद्र माह : पौष
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : त्रयोदशी – १४:०७ पर्यंत
नक्षत्र : आश्लेषा – २१:३० पर्यंत
योग : अतिगण्ड – २०:२१ पर्यंत
करण : तैतिल – १४:०७ पर्यंत
द्वितीय करण : गर – ०३:१४, मार्च ०६ पर्यंत
सूर्य राशि : कुंभ
चंद्र राशि : कर्क – २१:३० पर्यंत
राहुकाल : १७:१६ ते १८:४५
गुलिक काल : १५:४८ ते १७:१६
यमगण्ड : १२:५० ते १४:१९
अभिजित मुहूर्त : १२:२६ ते १३:१४
दुर्मुहूर्त : १७:१० ते १७:५८
अमृत काल : १९:४३ ते २१:३०
वर्ज्य : ०९:०० ते १०:४७
विमान उद्योगात रुची असणाऱ्या बीजू पटनायक यांनी महाविद्यालयीन शिक्षण बाजूला ठेऊन पायलट प्रशिक्षण घेतले. दुसऱ्या महायुद्धात ते रॉयल इंडियन एयर फोर्स मध्य सामील झाले.
जुलै, १९४७ मध्ये डचांच्या दबावामुळे इंडोनेशियाच्या तत्कालीन नेते सुलतान सजाहरिर यांना पं नेहरूंनी आयोजित केलेल्या १ल्या आंतरराष्टीय आशियायी सम्मेलनात हवाई मार्गे भारतात पोहचणे अशक्य होत होते. मात्र बीजू पटनायक यांनी सुलतान सजाहरिर यांना सिंगापूर मार्गे विमानातून भारतात सुखरूप आणले. ह्या कामगिरीमुळे पुढे त्यांना इंडोनेशिया मानद नागरिकत्व बहाल केले तसेच भूमी पुत्र ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१९१६: ओरिसाचे मुखमंत्री आणि स्वातंत्र्य सेनानी बिजू पटनायक यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९९७)
‘ए भय्या ठीकसे तोलो’ म्हणत भाजी घेणाऱ्या ललिताजी किंवा धबधब्याखालची ‘लिरिल गर्ल’ ही काल्पनिक पात्रे घराघरांत आणि अक्षरश मनामनांत पोहोचवणाऱ्या जाहिराती करणारे अॅ लेक पदमसी यांची अॅडगुरु अशी ओळख होती. वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी विल्यम शेक्सपिअरच्या ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं होतं.
त्यांचे बंधू बॉबी पदमसी यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं. शेक्सपिअर आर्थर मिलर, प्रताप शर्मा, गिरीश कार्नाड, विजय तेंडुलकर, इस्मत चुगताई अशा नाटककारांची नाटकेही त्यांनी केली होती. यानंतर अॅलेक यांनीही अनेक नाटकांचं दिग्दर्शन केलं होतं. १९८२ मध्ये ‘गांधी’ सिनेमात मोहम्मद अली जिना यांची व्यक्तिरेखा अॅलेक पदमसी यांनी साकारली होती. देशातील टॉप अॅडव्हर्टायझिंग कंपनी ‘लिंटास इंडिया’ची स्थापना त्यांनी केली होती. अॅतलेक पदमसी यांनी तब्बल १४ वर्षे ‘लिंटास इंडिया’चे सीईओपद भूषविले होते. ४० वर्षांपूर्वीच्या काळात १०० हून ब्रँड ‘लिंटास’ने उभे केले होते आणि या साऱ्यामागे कल्पनाशक्तीपासून सादरीकरणाच्या तपशिलांपर्यंत पदमसींचा मेंदू आणि हात चालत असे.
हमारा बजाज, लिरील, सर्फ, चेरी ब्लॉसम शू पॉलिश यांसारख्या आकर्षक जाहिराती त्यांनी बनवल्या होत्या. बोमन इराणी यांना थिएटरमध्ये पदमसी यांनी पहिली संधी दिली होती. अॅलेक पदमसी यांना २००० साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले होतं. नाट्यक्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी रुपवेध प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा तन्वीर सन्मान अॅलेक पदमसी यांना मिळाला होता.
१९२८ आधुनिक भारतीय जाहिरात विश्वाचे जनक पद्मश्री पुरस्कार सन्मानित ॲलेक पदमसी यांचा जन्म. ( मृत्यू : १७ नोव्हेंबर २०१८)
घटना :
१५५८: फ्रान्सिस्को फर्नांडिस यांनी धुम्रपान बनवण्यात पहिल्यांदा तंबाखूचा वापर केला.
१६६६: छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावरून आग्र्याला प्रयाण केले.
१८५१: जिओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया ची स्थापना झाली.
१९३१: दुसर्या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.
१९३३: भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.
१९६६: म्हैसूरचे राजे वाडियार यांचा बंगळुरूमध्ये असेलेला राजवाडा सरकारच्या ताब्यात घेण्याचा विधेयक मंजूर झाला.
१९९७: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशीत झाले.
१९९८: रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबईत आगमन झाले.
२०००: कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित केला.
• मृत्यू :
• १९१४: नाटककार, समीक्षक आणि प्राध्यापक शांताराम अनंत देसाई यांचे निधन.
• १९६६: साम्यवादी विचारांचे व्यासंगी नेते शंकरराव मोरे यांचे निधन. ( जन्म : १४ ऑगस्ट, १८९९ )
• १९६८: समाजशास्त्रज्ञ व ग्रंथकार नारायण गोविंद चाफेकर यांचे निधन. ( जन्म : ५ ऑगस्ट, १८६९)
• १९८५: कोशागार, तत्वज्ञ तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक देविदास दत्तात्रय वाडेकर यांचे निधन. (जन्म : २५ मे, १९०२)
• १९८५: महाराष्ट्र संस्कृतीकार पु. ग. सहस्रबुद्धे यांचे निधन. ( जन्म : १० जून , १९०४)
१९८९: गदार पार्टीचे एक संस्थापक पद्म भूषण बाबा पृथ्वीसिंग आझाद यांचे निधन. ( जन्म : १५ सप्टेंबर, १८९२ )
• १९९५: हिंदी चित्रपट अभिनेते जलाल आगा यांचे निधन. ( जन्म : ११ जुलै, १९४५ )
जन्म :
१९१०: संपादक श्रीपाद वामन काळे यांचा जन्म.
१९१३: किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका पद्मविभूषण गंगुबाई हनगळ यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै, २००९)