ऊसतोडी मजूर पुरवठा प्रकरणी ३९ लाखांची फसवणूक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

परभणीच्या टोळीवर गुन्हा

जत: ऊसतोडी मजूर पुरवण्याचे आमिष दाखवून सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात ३९ लाख ४० हजार रुपयांची मोठी फसवणूक उघडकीस आली आहे. याप्रकरणी दीपक धानु केसरकर (रा. खिलारवाडी) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी जत आणि परभणी जिल्ह्यातील एकूण चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून रोख आणि फोन-पे द्वारे वारंवार पैसे उकळले. मात्र, प्रत्यक्षात मजूर न पुरवल्याने आपली फसवणूक झाल्याचे केसरकर यांच्या लक्षात आले. जतचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रशांत चव्हाण या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »