ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली शेतकऱ्याची फसवणूक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सांगली: ऊसतोडणीसाठी मजूर पुरवण्याचे आमिष दाखवून एका शेतकऱ्याची १० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरज तालुक्यातील मानमोडी येथील रहिवासी आणि मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे कर्मचारी श्रीकांत शिवाजी चव्हाण यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

त्यांनी भिवा सायबू करचे (रा. पिंपरी, ता. माळशिरस) याच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे.संशयित आरोपी कर्चे याने चव्हाण यांच्या शेतातील ऊस तोडणीसाठी मजूर पुरवण्याचे आश्वासन दिले होते. १० जून २०२२ रोजी सांगलीतील राजवाडा चौक परिसरात बँकेद्वारे आणि रोख स्वरूपात एकूण १२ लाख ५० हजार रुपये कर्चे याला देण्यात आले. यावेळी दोन्ही पक्षांमध्ये रीतसर करारही झाला होता.पैसे घेतल्यानंतर कर्चे याने मजूर पुरवले नाहीत.त्याने घेतलेल्या रकमेपैकी केवळ २ लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित १० लाख ५० हजार रुपये देण्यास टाळाटाळ केली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »