छत्रपती कारखाना ठरला सर्वप्रथम वेतनवाढ करणारा मानकरी!

इंदापूर : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाने राज्य शासनाच्या त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार कामगारांना 10 टक्के वेतनवाढीला तत्त्वतः मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्वप्रथम वेतनवाढ लागू करण्याचा मान छत्रपती कारखान्याने मिळवला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली आहे. १२ ऑगस्ट रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा वेतन वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कामगार नेते युवराज रणवरे यांनीही याबाबत पदाधिकाऱ्यांना पेढे भरवून संचालक मंडळाचे आभार मानले आहेत.
दरम्यान, सभासद व कामगार ही एकाच रथाची दोन चाके असून, कामगारांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न राहील. कारखाना कुठेही मागे राहणार नाही. हा कारखाना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असल्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत १ एप्रिल २०२४ पासून मूळ पगार, महागाई भत्ता व स्थिर भत्त्याच्या एकूण रकमेवर १० टक्के वाढ आणि सोयी-सुविधा देण्याचा करार झाला होता. या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी, स्थानिक पातळीवरील २४ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या करारात बदल करण्याची मागणी शुगर वर्कर्स युनियन, वालचंदनगर यांनी केली होती.
या बैठकीस संचालक अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजीराव निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, निलेश टिळेकर, सतिश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, सौ. सुचिता सपकळ, सौ. माधुरी राजपुरे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, फायनान्स मॅनेजर हनुमंत करवर, तांत्रिक सल्लागार महादेव निकम, तसेच कामगार नेते युवराज रणवरे, सतिश गावडे, सुहास निंबाळकर व संजय मुळीक उपस्थित होते.