श्री दत्त-शिरोळ कारखान्यास साखर निर्यातीचा प्रथम पुरस्कार प्रदान

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे – श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.,शिरोळला सन २०२१-२०२२ मध्ये विक्रमी साखर निर्यात केल्याबद्दल नॅशनल फेडरेशन को-ऑप. शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांचा देशपातळीवरील प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे च्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरदचंद्रजी पवार, विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार, नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब पाटील, माजी राज्यमंत्री सतेज पाटील व विश्वजीत कदम उपस्थित होते.

सदरचा पुरस्कार चेअरमन गणपतराव पाटील, व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई, कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील यांनी स्विकारला. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ उपस्थित
होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »