साखर कारखान्यात मृत्यूचे तांडव: उकळत्या मळीने ७ कामगारांचा बळी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मुरकुंबी : बेळगाव जिल्ह्यातील मुरकुंबी येथील इनामदार साखर कारखान्यात बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास काळाने घाला घातला. ‘एव्हीसीपी क्रमांक १’ च्या व्हॉल्व्हची दुरुस्ती करत असताना अचानक बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे बाहेर पडलेली अतिउष्ण मळी कामगारांच्या अंगावर पसरली. या भीषण आगीत होरपळून ३ कामगारांचा घटनास्थळीच अंत झाला. पाच गंभीर जखमींपैकी चौघांचा आज (गुरुवारी) उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अन्य जखमींना झिरो ट्रॅफिक व्यवस्‍था करून तातडीने बेळगाव येथील केएलई रुग्‍णालयात हलविण्यात आले आहे. घटनेचे वृत्त समजताच पोलिस आणि कामगार खात्‍याच्या अधिकाऱ्यांनी घटनेची चौकशी करत पाहाणी केली. बेळगावचे जिल्‍हा पोलिस प्रमुख के. रामराजन यांनी केएलई रुग्‍णालयात जखमींची विचारपूस करून माहिती घेतली. या घटनेची नोंद मुरकुंबी पोलिसात झाली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »