माळेगाव साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र ढवाण

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : माळेगाव (ता. बारामती) माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी बारामती येथील राजेंद्र शंकरराव ढवाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वीचे उपाध्यक्ष तानाजीराव देवकाते यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागी ढवाण पाटील यांची निवड करण्यात आली.

संचालक मंडळाच्या शुक्रवारी कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी ढवाण पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर केले. या वेळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, रंजन तावरे, मावळते उपाध्यक्ष तानाजीराव देवकाते यांच्यासह सर्व संचालक, कार्यकारी संचालक अशोक पाटील तसेच सभासद, अधिकारी, कामगार उपस्थित होते.

Chandrakant Jadhav Malegaon Sugar
चंद्रकांत जाधव


सभासदांच्या अडचणी जाणून घेऊन त्यातून त्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न राहील. माझ्यावर दाखवलेला विश्वास व त्यातून दिलेली जबाबदारी कारखान्याचे अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकायनि पार पाडेन, असे उद्‌गार निवडीनंतर ढवाण पाटील यांनी काढले.


ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट प्रमुख आहेत. दरम्यान, याच बैठकीमध्ये कामगारांचे प्रतिनिधी संचालक म्हणून चंद्रकांत किसन जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »