माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये थेट मुलाखती

बारामती : ७५०० मे.टन, ३५ मे. वॅट वीज निर्मीती प्रकल्प, ६० केएलपीडी आसवनी क्षमता असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये मॅन्युफॅक्चरींग विभागात खालील रिक्त पदे त्वरित थेट मुलाखतीव्दारे भरावयाची आहेत. तरी सदर पदावर प्रत्यक्ष किमान ५ वर्षे काम केल्याचा अनुभव असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी कामाचा अनुभव, शैक्षणिक पात्रता, सध्याचा पगार, अपेक्षित पगार, इत्यादी सर्व माहीती व कागदपत्रांसह कारखाना स्थळावर शुक्रवारी, दिनांक ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता स्वखर्चाने उपस्थित रहावे, असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. मागासवर्गीय उमेदवारांना प्राधान्य देणेत येईल, असेही प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखाना लि., माळेगाव मु. (शिवनगर) ता. बारामती, जि. पुणे.
इमेल – malegaonsugar@gmail.com
मॅन्युफॅक्चरींग केमिस्ट (पदे ०२)
यासाठी शैक्षणिक पात्रता ही बी.एस्सी. (केमिस्ट्री), ए.एन.एस.आय (कानपुर) / ओ.व्ही.एस.आय (पुणे) कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक असून, साखर कारखान्यातील सदर पदावर प्रत्यक्ष ५ वर्षे काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे.
लॅब इनचार्ज (पद ०१)
या पदासाठी बी.एस्सी (केमिस्ट्री), ए.व्ही.एस.आय (पुणे) कोर्स उत्तीर्ण, तसेच साखर कारखान्यातील सदर पदावर प्रत्यक्ष ५ वर्षे काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे.