श्री छत्रपती साखर कारखान्यामध्ये १६ जागांसाठी थेट मुलाखती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

इंदापूर : १८ मॅगावेट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प व प्रतिदिन ६,५०० मे. टन गाळप क्षमता असलेल्या भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये  थेट मुलाखतीद्वारे खालील पदे त्वरीत भरावयाची आहेत. साखर कारखान्यातील सदर पदावर ५ ते ७ वर्षे प्रत्यक्ष काम केलेचा अनुभव असलेल्या व निवड झालेनंतर त्वरीत कामावर रुजू होवू शकतील, अशाच पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले पूर्ण नांव, पत्ता, वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, सध्याचा व अपेक्षित पगार इत्यादी माहिती नमूद असलेल्या अर्जासह व दाखल्याच्या सत्य प्रतीसह दिनांक १२/०८/२०२५ रोजी दुपारी १:०० वाजता कारखाना कार्यस्थळावरील कार्यालयात मुलाखतीसाठी उपस्थित राहाण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पत्ता ः  श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना लि., भवानीनगर, ता.  इंदापूर, जि. पुणे.

ईमेल आयडी : scssklb@gmail.com

पदांचा तपशील खालीलप्रमाणे

पदांचे नाव                             संख्या                     शैक्षणिक पात्रता

१. को जन मॅनेजर                       १                              बी.ई. (Mech./Ele.) / D.M.E., B.O.E.

२. ऊस विकास अधिकारी १              एम.एस्सी. (अॅग्री) / बी.एस्सी. (अॅग्री)

३. इन्स्ट्रुमेंट इंजिनिअर         १              बी.ई. (इन्स्ट्रु.) / डी.ई. (इन्स्ट्रु.) ओ. व्ही. एस. आय.

४. मॅन्यु. केमिस्ट                   २          बी.एस्सी. (केमिस्ट्री), ओ.व्ही.एस.आय. / ओ.एन.एस.आय. (शुगर टेक)

५. ज्युस सुपरवायझर           २             एस.एस.सी., व्ही. एस. आय. ज्युस सुपरवायझर कोर्स आवश्यक

6.  मिल फोरमन                    १              आय. टी. आय. फिटर

७. इलेक्ट्रिशियन                   २             आय.टी.आय. (इलेक्ट्रिशियन) व इलेक्ट्रिकल सुपरवायझर लायसेन्स आवश्यक.

८. वायरमन वर्ग -१               ३  आय. टी. आय. वायरमन ए ग्रेड परीक्षा पास व इलेक्ट्रिकल सुपरवायझर लायसेन्स आवश्यक.

९.  फायरमन (हंगामी)        ३             एस.एस.सी., फर्स्ट क्लास / सेकंड क्लास बॉयलर अटेंडंट परीक्षा पास

टीप : १) अनुसूचित जाती, जमाती व मागासवर्गीय पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. २) वरील १ ते ४ पदांकरिता संगणक ज्ञान आवश्यक.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »