प्रतिष्ठेच्या डीएसटीए पुरस्कारांचे हे आहेत मानकरी
पुणे : साखर उद्योग क्षेत्राला १९३६ पासून प्रदीर्घ काळ तांत्रिक मार्गदर्शन करणारी आघाडीची संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन इंडियाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आणि साखर उद्योग क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या वार्षिक पुरस्कारांची प्रतीक्षा २४ ऑगस्टला अखेर संपली.
संस्थेच्या ६९ व्या वार्षिक अधिवेशनात या पुरस्कारांचे वितरण दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
साखर उद्योगात भरीव योगदान देणारे माजी मंत्री आणि ‘मांजरा साखर परिवारा’चे प्रमुख दिलीपराव देशमुख (महाराष्ट्र), राष्ट्रीय साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे (नवी दिल्ली), व्हीआयएनपी (कर्नाटक) ग्रुपचे विवेक हेब्बल, क्रांतीअग्रणी साखर कारखान्याचे चेअरमन अरुणअण्णा लाड (महाराष्ट्र), अमृतलाल पटेल (गुजरात) आणि ‘एसटीएआय‘चे अध्यक्ष संजय अवस्थी (उत्तर प्रदेश) यांचा साखर उद्योग गौरव पुरस्कार देऊन टाळ्यांचा गजरात सन्मान करण्यात आला.
इतर श्रेणीतील पुरस्कार आणि पुरस्कार विजेते खालीलप्रमाणे
बेस्ट शुगर फॅक्टरी
- १. एमआरएन शुगर (कर्नाटक)
- २. श्री खेडुत एसएसकेयूएम लि. (गुजरात)
- ३. माळेगाव सह. साखर कारखाना (महाराष्ट्र)
- ४. सतीश शुगर्स लि. (कर्नाटक)
- ५. विलास सह. साखर कारखाना (महाराष्ट्र)
- ६. श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना (महाराष्ट्र)
टेक्निकल एक्सलन्स अवॉर्ड
- १. आयसीएआर सेंट्रल इन्स्टिट्यूट अँड ॲग्री इंजिनिअरिंग रिजनल स्टेशन, कोइम्बतूर (तामिळनाडू)
- २. सेंट्रल शुगरकेन रिसर्च सेंटर, पाडेगाव (महाराष्ट्र)
- ३. एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूट, बेळगावी (कर्नाटक)
- ४. आंतरराष्ट्रीय साखर सल्लागार जे. जे. भगत (नवी दिल्ली)
- ५. राष्ट्रीय साखर महासंघाचे मुख्य तांत्रिक सल्लागार के. मुरलीधर चौधरी (आंध्र प्रदेश)
इंडस्ट्रीयल एक्सलन्स अवॉर्ड
- १. प्रभुलिंगेश्वर शुगर फॅक्टरीचे संस्थापक जगदीश गुडगुंटी
- २. एस. बी. रिशेलर्सचे सचिन शिरगावकर
- ३. श्रीजी ग्रुपचे संस्थापक जी. डी. अगरवाल
- ४. एसईडीएलचे संस्थापक विवेक वर्मा
- ५. व्ही. एम. बायोटेकचे संस्थापक व्ही. एम. कुलकर्णी
लाईफ ॲचिव्हमेंट अवॉर्ड
- १. एसईडीएलचे (हरियाणा) प्रेसिडेंट ए. के. नंदा (तांत्रिक विभाग)
- २. व्हीएसआयचे तांत्रिक सल्लागार पी. जी. पाटील (इलेक्ट्रिकल विभाग)
- ३. सिद्धनाथ शुगरचे सीईओ संजीवकुमार जाधव (मॅनेजमेंट विभाग)
- ४. ‘भैरवनाथ’चे एस. एल. पाटील
- ५. भीमराव पी. पाटील (कृषी)
- ६. एम. के. विश्वास (विशेष पुरस्कार)
कार्यक्रमाची छायाचित्रांकित झलक पाहा