तोडणी मशिनमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : ऊस तोडणी मशिनमध्ये अडकून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. आनंदा शंकर खाडे (वय ८५) असे त्यांचे नाव आहे. बुधवारी दुपारी पुलाची शिरोली येथे ही दुर्घटना घडली.

एका सहकारी साखर कारखान्यामार्फत ऊस तोडणी मशिनच्या साहाय्याने खाडे यांच्या शेतात ऊसतोड सुरू होती. खाडे हे मशिनच्या पाठोपाठ जाऊन ट्रॉलीच्या बाहेर पडलेल्या उसाच्या कांड्या गोळा करून ट्रॉलीत टाकत होते. मशिनचालकाने अचानक रिव्हर्स गियर टाकून मशिन मागे घेतले.

त्यामुळे खाडे हे मशिनमध्ये अडकले. ते हे बेशुद्ध पडले होते. त्यांना तत्काळ कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यां‍नी खाडे यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. त्यांच्या मागे दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »