ऊस तोडणी मजुरांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

सोलापूर – महिला व पुरुष अशा दोन्ही मजुराना प्रत्येकी पाचशे रुपये रोज मजुरी देतो, आठवड्याचे रेशन मोफत देतो, असे आश्वासन देऊन मध्य प्रदेशातील बालाघाट येथील १५ जणांना फसवून त्यांना ऊस तोडणीसाठी आणुन उपाशी ठेवत डांबुन ठेवल्या प्रकरणी ढोक बाभुळगाव येथील एका शेतकऱ्यासह चार जणावर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ५ डिसेंबर रोजी उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहिनुसार, कालावटी तांडा जिल्हा बालाघाट येथील मुकादम शेषराव गंम्फु यादव रा. मरारी आणि महाराष्ट्रातील पाच जणांनी २ नोव्हेंबर रोजी कालावटी तांडा येथे जावुन प्रवीण फुलसिंग इनवाती (वय २६ रा खर्राकोना जिल्हा बालाघाट) यांची भेट घेऊन ऊस तोडणी साठी मजूर अणण्यासाठी गेले होते. मात्र येथे आल्यावर त्यांची फसवणुक झाल्याचे लक्षात आले.