‘सीताराम महाराज साखर’च्या संचालक मंडळावर ‘सेबी’चे कठोर निर्बंध

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मालमत्ता आणि बँक खात्यांचा तपशील देण्याचे आदेश

मुंबई : वादग्रस्त सीताराम महाराज साखर कारखाना, लि. खर्डी (सोलापूर) या कंपनीला केवळ गुंतवणूकदारांची सर्व रक्कमच परत करण्यास सांगितली नसून, सर्व संचालक मंडळावर ‘सेबी’ने कठोर निर्बंध लादले आहेत. एवढेच नाही, तर जे दोन संचालक दिवंगत झाले आहेत, त्यांच्या मालमत्तेवर प्रसंगी टाच आणण्याचा इशाराही दिला आहे.


‘सेबी’ने (सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी संस्था) आपल्या सविस्तर आदेशामध्ये इतरही मुद्यांचा तपशीलवार उल्लेख केला आहे. ‘सेबी’ने कडक निर्बंध लादताना म्हटले आहे, की ‘गुंतवणूकदारांची १७ कोटींची रक्कम कारखान्याच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या (५ जानेवारी २०२३) कालावधीसाठी १५ टक्के दराने पुढील वर्षी म्हणजे ५ जानेवारी २०२३ पर्यंत परत करावी, त्यानंतर तीन वर्षांसाठी या सर्व संचालकांना अन्य कोणत्याही कंपनीच्या संचालक मंडळावर राहता येणार नाही, तसेच कोणत्याही स्वरूपात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पैसे गोळा करता येणार नाही.’

‘सेबी’च्या सदस्या अश्विनी भाटिया यांनी दिलेल्या आदेशाचा सविस्तर तपशील असा :
मी, कलम 11, 11 (4) आणि 11 ब अंतर्गत मला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करताना
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया कायदा, 1992 कलम 73 सह कंपन्यांचे वाचन
कायदा, 1956 आणि कंपनी कायदा, 2013 चे कलम 42 आणि गुंतवणूकदारांच्या हितासाठी
याद्वारे खालील दिशानिर्देश देत आहे –

अ. सीताराम महाराज साखर कारखाना (खर्डी) लिमिटेडचे संचालक मंडळ विलास वसंतराव काळे (एम. डी.); दिलीप प्रल्हाद काळे; नाना नारायण काळे; शंकर किसन बागल; बबन सदाशिव सोनावळे; शोभा रूपेश पवार; महादेव मल्लिकार्जुन देठे; गणेश मोहनराव ठिगळे; उत्तम रामचंद्र नाईकनवरे आणि जयश्री विलासराव काळे हे गुंतवणूकदारांचे पैसे परत करतील. या आदेशाच्या तक्ता -7 मध्ये क्रिस्टलाइझ केलेल्या एनसीआरपीएस जारी करून, एक सह गुंतवणूकदारांना 15% वार्षिक व्याज, निधी गोळा केल्याच्या तारखेपासून वास्तविक पेमेंटची तारीख, 05 जानेवारी 2023 पर्यंत.

(तक्ता क्र. सातमध्ये एकूण ५६९६ गुंतवणूकदारांचे १७.१० कोटी रुपये देणे असल्याचे म्हटले आहे. सोबत ऑर्डर जोडली आहे.)

ब. सीताराम महाराज साखर कारखाना (खर्डी) लिमिटेडचे संचालक विलास वसंतराव काळे (एम. डी.) ; दिलीप प्रल्हाद काळे; नाना नारायण काळे; शंकर किसन बागल; बबन सदाशिव सोनावळे; शोभा रूपेश पवार; महादेव मल्लिकार्जुन देठे; गणेश मोहनराव ठिगळे; उत्तम रामचंद्र नाईकनवरे आणि जयश्री विलासराव काळे यांनी त्यांच्या सर्व मालमत्ता, सर्व प्रकारची गुंतवणूक (म्युच्युअल फंड/शेअर/सिक्युरिटीजचे होल्डिंग्स), सर्व बँक खात्यांचा तपशील, डिमॅट खात्यांची माहिती सादर करावी.

क. सीताराम महाराज साखर कारखाना (खर्डी) लिमिटेडचे विलास वसंतराव काळे; दिलीप प्रल्हाद काळे; नाना नारायण काळे; शंकर किसन बागल; बबन सदाशिव सोनावळे; शोभा रूपेश पवार; महादेव मल्लिकार्जुन देठे; गणेश मोहनराव ठिगळे; उत्तम रामचंद्र नाईकनवरे आणि जयश्री विलासराव काळे यांना त्यांची मालमत्ता केवळ गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यासाठी, विक्री करण्याची परवानगी राहील. त्यातून आलेले उत्पन्न राष्ट्रीयीकृत बँकेत उघडलेल्या एस्क्रो खात्यात जमा करावे.

ड. सीताराम महाराज साखर कारखाना (खर्डी) लिमिटेड आणि तिचे सध्याचे संचालक यांनी दोन राष्ट्रीय वृत्तपत्रे (एक इंग्रजी आणि एक हिंदी) आणि एका मराठी दैनिकात जाहिरात प्रसिद्ध करून, परतफेड कशी होणार आहे, संपर्क क्रमांक आदी विस्तृत तपशील जाहीर करावा. त्यासाठी १५ दिवसांची मुदत आहे.

इ. उपरोक्त परतफेड पूर्ण केल्यानंतर सीताराम महाराज साखर कारखाना (खर्डी) लिमिटेड आणि तिचे सध्याचे संचालक मंडळ यांनी परतफेडीचा सविस्तर अहवाल ‘सेबी’ला सादर करावा. शिवाय त्याची विस्तृत माहिती दोन राष्ट्रीय वृत्तपत्रे आणि एका स्थानिक भाषिक (मराठी) दैनिकात १५ दिवसांच्या आता प्रसिद्ध करावी.

फ. सीताराम महाराज साखर कारखाना (खर्डी) लिमिटेड; विलास वसंतराव काळे; दिलीप प्रल्हाद काळे; नाना नारायण काळे; शंकर किसन बागल; बबन सदाशिव सोनावळे; शोभा रूपेश पवार; महादेव मल्लिकार्जुन देठे; गणेश मोहनराव ठिगळे; उत्तम रामचंद्र नाईकनवरे आणि जयश्री विलासराव काळे यांना शेअर बाजारात कोणत्याही स्वरूपाचा व्यवहार न करण्याचे निर्देश आहेत. त्यांना व्यक्तिगत पातळीवर किंवा संस्थात्मक पातळीवर रोखे, शेअर, डिबेंचर्स, म्युचअल फंड आदी कोणत्याही प्रकारात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करता येणार नाही. हे निर्बंध गुंतवणूकदारांचे पैसे परत केल्यानंतर किमान तीन वर्षे राहतील.

ग. सीताराम महाराज साखर कारखाना (खर्डी) लिमिटेड, विलास वसंतराव काळे; दिलीप प्रल्हाद काळे; नाना नारायण काळे; शंकर किसन बागल; बबन सदाशिव सोनावळे; शोभा रूपेश पवार; महादेव मल्लिकार्जुन देठे; गणेश मोहनराव ठिगळे; उत्तम रामचंद्र नाईकनवरे आणि जयश्री विलासराव काळे हे गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यात अपयशी ठरले, तर ‘सेबी’ त्यांच्याकडून ही सर्व रक्कम वसूल करेल. दिवंगत संचालक गोरख नरहरी ताड आणि शहाजी नामदेव शेंडगे यांच्या मालमत्तांवर कारवाई करण्याचे अधिकारही ‘सेबी’ला आहेत.

या प्रकरणात ॲड. दीपक पवार यांनी तक्रार केली होती. त्यावर बरेच दिवस सुनावणी चालली.

इंग्रजी ऑर्डर खालील प्रमाणे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »