अंतिम उतारा निश्चित होईपर्यंत या दराने द्या एफआरपी : राज्य सरकारचा आदेश
पुणे – यंदाच्या हंगामाचा (२३-२४) अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत कोणत्या बेस रेटने एफआरपी रक्कम द्यायची याची गाईडलाइन राज्य सरकारने जारी केली आहे. त्यामुळे संभ्रम टळणार आहे.
सहकार, पणन विभागाच्या संबंधित परिपत्रकात खालीलप्रमाणे बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
केंद्र शासनाने दिनांक ०६/०७/२०२३ रोजीच्या अधिसूचनेद्वारे, गाळप हंगाम २०२३-२४ साठीचा किमान एफआरपी ऊसदर प्रसिध्द केलेला आहे. सदर अधिसूचनेद्वारे जाहिर केलेला ऊस दर विचारात घेता, गाळप हंगाम २०२२-२३ साठी जाहिर केलेल्या एफआरपी ऊसदरात वदल झालेला आहे. सदर वदल आणि त्यासंदर्भातील दिनांक २१/०२/२०२२ रोजीच्या शासन निर्णयातील निर्देश विचारात घेता, २०२३-२४ हंगामाचा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत, हंगाम सुरू झाल्यापासून गाळप केलेल्या ऊसासाठी सुरुवातीचा किमान एफआरपी ऊसदर निश्चित करताना आधारभूत धरावयाचा किमान साखर उतारा निश्चित करणे आवश्यक असल्याने शासनाने त्याबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे.
गाळप हंगाम २०२३-२४ व त्यापुढील हंगामाचा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत, हंगाम सुरू झाल्यापासुन गाळप केलेल्या ऊसासाठी सुरूवातीचा किमान एफआरपी ऊसदर अदा करताना आधारभूत धरावयाचा साखर उतारा महसूल विभागनिहाय पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे.
वरीलप्रमाणे आधारभूत साखर उतारा विचारात घेऊन त्या त्या महसुल विभागातील साखर कारखान्यांनी केंद्र शासनाने सन २०२३-२४ च्या हंगामासाठी एफ.आर.पी. च्या धोरणात दि.०६/०७/२०२३ च्या अधिसचनेद्वारे निश्चित केलेल्या मूलभूत एफ आर पी दरानुसार हंगामाच्या सुरुवातीचा किमान एफ.आर.पी. ऊसदर खालीलप्रमाणे निश्चित करून ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ मधील कलम ३ नुसार अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
- १. हंगाम २०२३-२४ करीता बेसिक १०.२५% साखर उताऱ्यासाठी रास्त व किफायतशीर ऊसदर प्रति क्विंटल रू.३१५/-
- २. साखर उतारा १०.२५% च्या वरील प्रत्येक ०.१% उतारा वाढीसाठी प्रिमियम दर रु.३.०७ प्रति क्विटल
- ३. साखर उतारा १०.२५% पेक्षा कमी परंतु ९.५०% पेक्षा जास्त असलेल्या प्रकरणी, प्रत्येक ०.१% उतारा घटीसाठी रू. ३.०७ प्रति क्विंटल तथापि, साखर उतारा ९.५०% किंवा त्यापेक्षा कमी असल्यास रास्त व किफायतशीर ऊसदर रू.२९१.९७५ प्रति क्विंटल.
आधारभूत धरावयाचा किमान साखर उतारा यासह इतर सर्व धोरणात्मक बाबी ह्या दि. २१/०२/२०२२ रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे राहतील. उपरोक्त आदेश गाळप हंगाम २०२३ २४ साठी पासुन लागू राहील.