जी 7 शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती

परभणी : नामांकित सेंद्रिय दाणेदार खत प्रकल्पासाठी खाली नमूद केलेली पदे भरावयाची आहेत. तरी सदर पदावर खत/बी-बीयाणे क्षेत्रात प्रत्यक्ष काम केलेल्या अनुभवी व पात्र उमेदवारांनी बायो-डाटासह आपले अर्ज दि. ३० डिसेंबर २०२५ पर्यंत खालील पत्त्यावर किंवा ई-मेलद्वारे विहित मुदतीत कारखाना कार्यालयात पोहोचतील असे पाठवावेत. तसेच मुळ कागदपत्रे प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी सादर करावीत, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
पत्ता- जी 7 शुगर लिमिटेड, विजयनगर, अकोली, माखणी-कोद्री रोड, गंगाखेड जि. परभणी-४३१५१४
ई-मेल: hr@g7sugar.com
पदांचा तपशील खालीलप्रमाणे
– सेल्स मॅनेजर (विक्री अधिकारी) (०१)
शैक्षणिक पात्रता व अनुभव – कृषी पदवी/एम.बी.ए. (मार्केटींग) व कृषी खत/बी-बीयाणे विक्री व्यवस्थापनाचा किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
– सेल्स एक्झिक्युटिव्ह (१५)
शैक्षणिक पात्रता व अनुभव – कृषी पदवी/पदवीका (डिप्लोमा) व कृषी खत/बी-बीयाणे विक्रीचा किमान १ ते २ वर्षाचा अनुभव आवश्यक.
– सुपरवायझर (०१)
शैक्षणिक पात्रता व अनुभव – कोणत्याही शाखेतील पदवी/पदवीका किंवा खत उत्पादन युनिट फॅक्टरीत २ वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक.
– प्लॅन्ट ऑपरेटर (०१)
शैक्षणिक पात्रता व अनुभव – आय.टी.आय./१२ वी पास व खत उत्पादन प्रकल्प/केमिकल युनिटमध्ये कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
– लॅब केमिस्ट (०२)
शैक्षणिक पात्रता व अनुभव – बी.एस्सी/एम.एस्सी (केमिस्ट्री) कृषी खत प्रकल्प/केमिकल लॅबोरेटरी मध्ये २ वर्ष काम केल्याचा अनुभव



