विखे-पाटील कारखान्याचा ऐतिहासिक विक्रम

आवडल्यास ही बातमी शेअर करा

७६ व्या गळीत हंगामाची सांगता

राहाता (अहिल्यानगर) : आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचा वारसा जपणाऱ्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने आपल्या ७६ व्या गळीत हंगामात एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील आणि संचालक मंडळाने अत्यंत कमी वेळात नवीन यंत्रणा उभी करून गळीत हंगाम यशस्वी केला. कारखान्याने आपल्या विस्तारित प्रकल्पाची १०,००० मेट्रिक टन प्रतिदिन गाळप क्षमता केवळ सहा महिन्यांच्या विक्रमी कालावधीत कार्यान्वित करून दाखवली आहे.

दरम्‍यान, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत हंगामाचा सांगता समारंभ पार पडला. यावेळी सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, तहसीलदार अमोल मोरे, कार्यकारी संचालक महेश कोनापुरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

कारखान्याने सलग ३,२०० रुपयेप्रतिटन या दराने ऊस पेमेंट देऊन राज्यात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. भविष्यात कारखान्याची गाळप क्षमता १५,०००टन पर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 

उत्पादनवाढीचे आवाहन
कार्यक्रमात बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, यंदा अतिवृष्टीमुळे उसाच्या वजनात घट झाली आहे. त्यामुळे आगामी काळात उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकरी, कामगार आणि संचालक मंडळाने गटनिहाय नियोजन करणे आवश्यक आहे. 

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »