औद्योगिक सुरक्षा सप्ताह

आवडल्यास ही बातमी शेअर करा

दिनांक 4 मार्च ते 11 मार्चपर्यंत “औद्योगिक सुरक्षा सप्ताह” म्हणुन साजरा केला जातो. कारखान्यात होणारे अपघात टाळण्याच्या दृष्टीने व कामगारांमध्ये, व्यवस्थापनामध्ये सुरक्षिततेची जाणीव निर्माण करण्याच्या हेतुने हा लेखन प्रपंच.

औद्योगिक सुरक्षेमध्ये “कामगार” हा केंद्रबिंदु आहे. उत्पादन प्रक्रीयेत त्याचा सिंहाचा वाटा असतो. म्हणुन सुरक्षितता ही एक दिवसाची नसुन 365 दिवस 24 तास अविश्रांत चालणारे चक्र आहे. कारखान्यातला प्रत्येक कामगार हा कारखान्यात सुरक्षित रहावा म्हणुन व्यवस्थापनाने हे “सुरक्षाचक्र” फिरवायचे आहे.

कारखान्यात काम करतांना सुरक्षित असणे जेवढे गरजेचे आहे,तेवढेच कारखान्यात पोषक वातावरण असणेही गरजेचे आहे.

“SHE” takes care while working in factory. या वाक्यातील “SHE” मध्ये ञिवेणी संगम आहे. तो असा S- Safety- सुरक्षितता,
H- Health- आरोग्य, E- Environment- वातावरण.
सुरक्षितता व उत्पादकता या एकाच नाण्याच्या दोन बाजु असल्यामुळे उत्पादकतेएवढेच सुरक्षिततेचे महत्व आहे.

आज महाराष्ट्र हे देशातील औद्योगिक क्षेञात एक अग्रगण्य राज्य आहे. राज्यात अंदाजे 30 हजारापेकशा जास्त कारखाने असुन अंदाजे 24 लाख कामगार काम करीत आहे. अनियोजित व अनपेक्षीत घडणारी घटना म्हणजे अपघात होय. कारखान्यातील 85 टक्के अपघात हे चुकीची क्रीया केल्यामुळे तर 15 टक्के अपघात असुरक्षित परिस्थितीने घडत असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे.
अपघाताची कारणे : –

  • असुरक्षित वातावरण: – एखाद्या यंञावर/मशिनवर फिरणाऱ्या धोकादायक भागावर सुरक्षा गार्ड/ झाकण नसतांनाही मशिनवर काम करणे.
  • निष्काळजीपणा: – यंञावर काम करत असतांना कामाव्यतिरीक्त दुसरीकडे लक्ष देणे तसेच मोबाईलवर बोलणे.
  • अतिआत्मविश्वास: – यंञावर धोकादायक भागावरील सुरक्षा गार्ड बाजुला काढलेला असतांना किंवा बेल्ट पुलावरील सुरक्षा गार्ड बेल्ट बदलल्यानंतर धोकादायक भागावर न ठेवता तसेच वैयक्तीक सुरक्षा साधनांचा वापर न करता अतिआत्मविश्वासाने यंञावर काम करणे.
  • अकुशल कामगार: -.कारखान्यातील यंञाबाबत माहीती नसलेल्या कामगारांना काम करुन दिल्यास अपघात होवु शकतो.
  • अपघात टाळण्यासाठी उपाययोजना:-
  • मशिन/यंञाचा धोकादायक भागावर अर्थात मशिनचा बेल्ट,पुली,गिअर,ग्राईंडींग व्हील, शाफ्ट,प्लाय व्हील या भागावर सुरक्षा भागावर सुरक्षा गार्ड लावुन काम करणे.
  • सेफ्टी शुज, सेफ्टी गॉगल्स, हॅंडग्लोज इ. घालुनच काम करणे.
  • कामगारांना धोकादायक मशिनविषयी माहीती देणे.
  • ज्वालाग्राही पदार्थ, रसायने हाताळण्यााविषयी सुचना देणे तसेच धोक्याविषयी सुचना फलक लावणे
  • उंचीवर काम करतांना सुरक्षा बेल्ट, हेल्मेट, सुरक्षा बुट घालुन काम करावे तसेच वर्क परमिट पध्दतीने काम केल्यास अपघाट टाळता येवु शकतो.

कामगारांकडुन आलेल्या उपाययोजना राबविल्यास सुरक्षित वातावरणनिर्मितीस प्रोत्साहन मिळेल व अपघातशुन्य ध्येयाकडे वाटचाल करण्यास मदत होईल.

  • लेखन , संकलन – बबलू पाचंगे
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »