ऑफ सीझन २०२३

२०२३ चा गळीत हंगाम संपत आला, या पार्श्वभूमीवर ही आगळी-वेगळी कविता कारखान्यांना विविध कामांची आठवण करून देतेय….
ऑफ सीझन २०२३
गळीत संपले, संपला आता सीझन।
करा प्राथमिक सफाई झटकन।।
केनयार्ड अन् बगॅस यार्ड साफ करा।
सर्व केरकचरा कंपोस्ट मध्ये भरा।।
चिमणी- बॉयलरची राख साफ करा।
हॉपर एलेव्हेटर ग्रेडर साफ करा।।
सायलो अन् कैची कॉलम साफ करा ।
शुगर हाऊसची साखर गोळा करा ।।
क्रिस्टलायझर, सिरप टाक्या खाली करा ।
केनकॅरिअर, मिल धुऊन सफाई करा ।।
बॉयलिंग हाऊस मशिनरी धुऊन काढा ।
टर्बाईन, गिअर बॉक्सचे ऑईल काढा ||
बॉयलर केमिकल करा, ट्युब सफाई करा ।
स्प्रे इंजेक्शन इटीपी त्वरित साफ करा ।।
गॅस, सिरप, स्प्रे पाईप खोला भराभरा ।
एनडीटी टेस्ट वॉटर टेस्ट लवकर करा ।।
खराब पाईप बेंड व्हॉल्व बाजूला करा ।
नवीन मालाचे मागणीपत्र सादर करा ।।
याप्रमाणे ऑफ सीझनची तयारी करा ।
सीझन २३/२४ चा ध्यास धरा, ध्यास धरा ।।
रचनाकार: वा. र. आहेर
नाशिक मोबा. ९९५८७८२९८२