सदाशिव गोविंद बर्वे

आज सोमवार, मार्च ६, २०२३ रोजीचे
पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर फाल्गुन १५, शके १९४४
सूर्योदय : ०६:५४ सूर्यास्त : १८:४५
चंद्रोदय : १७:५५ चंद्रास्त : ०६:५२, मार्च ०७
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
उत्तरायण
ऋतू : शिशिर
चंद्र माह : फाल्गुन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : चतुर्दशी – १६:१७ पर्यंत
नक्षत्र : मघा – ००:०५, मार्च ०७ पर्यंत
योग : सुकर्मा – २०:५५ पर्यंत
करण : वणिज – १६:१७ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – ०५:१५, मार्च ०७ पर्यंत
सूर्य राशि : कुंभ
चंद्र राशि : सिंह
राहुकाल : ०८:२३ ते ०९:५२
गुलिक काल : १४:१९ ते १५:४८
यमगण्ड : ११:२१ ते १२:५०
अभिजित मुहूर्त : १२:२६ ते १३:१४
दुर्मुहूर्त : १३:१४ ते १४:०१
दुर्मुहूर्त : १५:३६ ते १६:२३
अमृत काल : २१:२५ ते २३:१२
वर्ज्य : १०:४८ ते १२:३४
भारतातल्या वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा होतो. ह्या उत्सवाला “होलिकादहन” किंवा “होळी”, “शिमगा”, “हुताशनी महोत्सव”, “दोलायात्रा”, “कामदहन” अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिग्मो किंवा शिग्मा म्हणतात.
आज होळी सण आहे
आज दंतवैद्य दिन आहे
कर्तबगार प्रशासक- सदाशिव गोविंद बर्वे
यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल येथे नंतर अर्थशास्त्राचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. उच्च शिक्षणासाठी ते केंब्रिजला गेले आणि तेथून ट्रायपॉस म्हणजे बी ए, अर्थशास्त्र आणि आय. सी. एस. या तीनही परीक्षा उत्तीर्ण झाले.
१९३६ साली भारतात परत येऊन अहमदाबादला ते उपजिल्हाधिकारी म्हणून सनदी सेवेत रुजू झाले.
पुणे शहरातील ८० फूट रुंदीचा जंगली महाराज रस्ता त्यांच्याच काळात बांधला गेला. हा पुण्यातला पहिला रुंद रस्ता. त्यांनी पुण्याभोवती रिंग रेल्वेची कल्पना मांडली पण मुंबईत आणि दिल्लीत बसलेल्या राज्यकर्त्यांनी ती पूर्णत्वास येऊ दिली नाही.
राजकीय इच्छाशक्तीअभावी ती पूर्ण झाली नाही. स.गो. बर्वे यांच्या पूर्ण झालेल्या योजनांमध्ये पर्वती आणि हडपसर औद्योगिक वसाहती, संभाजी, पेशवे, शाहू ही उद्याने, संभाजी पूल व धार्मिक स्थळे हलवून कांही रस्ते रुंद करणे इत्यादी कामे झाली. १९५७ मध्ये ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव झाले. व कोयना धरण उभारणीसाठी जागतिक बँकेकडून कर्ज मिळवले.
वसंतराव नाईक मंत्रिमंडळात ते उद्योगमंत्री झाले. जिल्हास्तरावर MIDC उभारणीत मोठा वाट होता. पुण्यातील भोसरी MIDC, ठाण्यातील वागले इंडस्ट्रिअल इस्टेट, तसेच इतरत्र MIDC विस्तार केला. मुंबईतले खाडी पूल, दोन्ही एक्स्प्रेस हायवेज या महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी मंजूर करून घेतल्या. या कामाची दखल घेत पंतप्रधान लाल बहादुर शास्त्रींनी त्यांना नियोजन मंडळावर उद्योग विभागाचे सदस्य म्हणून नेमले.
१९६७ मध्ये त्यांनी ईशान्य मुंबईतून लोकसभा मतदार संघातून निवडून आले पण निकालाच्या दिवशी अतिश्रमाने त्यांचे हृदयक्रिया बंद पडून निधन झाले.
• १९६७: कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे यांचे निधन. (जन्म : २७ एप्रिल, १९१४)
रणजीत देसाई इतिहासाला शब्द देणारा लेखक :
मराठीत ऐतिहासिक कादंबरी लेखनाची मोठी परंपरा आहे. रणजीत देसाई हे या नामावलीतील फार वरचे नाव. छत्रपती शिवाजी महाराजांवरील त्यांची ‘श्रीमान योगी’ ही मराठीतील एक श्रेष्ठ कादंबरी गणली जाते.
शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व लेखनातून पेलणे ही बाब सोपी नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी समोरच्या शत्रूशी सुरू असलेली लढाई आणि त्याचवेळी घरच्या आघाडीवर सुरू असलेले समर प्रसंग यातून महाराजांनी कार्य सिद्धीस नेले.
महाराजांच्या या पराक्रमाविषयीची नोंद पुस्तकात आहेच, पण एक पिता म्हणूनही त्यांची वेगळी मांडणी आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचायला हातात घेतले की खाली ठेववत नाही.
‘ स्वामी’ ही देसाईंची आणखी एक लोकप्रिय कादंबरी. माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील ही कादंबरीही वाचनीय आहे. इतिहास सांगताना त्याची अतिशय रंजक मांडणी देसाईंनी या पुस्तकात केली आहे. श्रीमान योगी व स्वामी या दोन्ही पुस्तकांची भारतीय साहित्य अकादमीने हिंदीत भाषांतरे केली आहेत.
याशिवाय देसाईंची ‘पावनखिंड’ ही आणखी एक ऐतिहासिक कादंबरी. त्यांची ‘राधेय’ ही कर्णावरची कादंबरीही लोकप्रिय आहे. राजा रविवर्मा या श्रेष्ठ भारतीय चित्रकारावरील चरित्रात्मक कादंबरी आवर्जून वाचण्यासारखी आहे.
देसाईंनी फक्त ऐतिहासिक साहित्य लिहिले असे नाही. ग्रामीण साहित्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. सवाल माझा ऐका, रंगल्या रात्री या गाजलेल्या चित्रपटांच्या कथाही त्यांनीच लिहिल्या. त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
१९७३ मध्ये पद्मश्री देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या स्वामी कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. १९९० मध्ये त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
• १९९२: सुप्रसिद्ध मराठी लेखक पद्मश्री पुरस्कार सन्मानित रणजीत देसाई यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल , १९२८)
घटना :
१८४०: बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.
१९०२: रेआल माद्रिद फुटबॉल क्लब ची स्थापना झाली.
१९४०: रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी झाली.
१९५३: जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.
१९५७: घाना देशाचा स्वातंत्र्य दिन.
१९६४: कॅशियस क्ले यांनी मुहम्मद अली ये नाव धारण केले.
१९७१: भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीज विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला.
१९७५: इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.
१९९२: मायकेल अँजेलो हा संगणक विषाणू पसरण्यास सुरवात झाली.
१९९९: राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते जगपप्रसिध्द खजुराहो मंदिर समूहाच्या सह्स्त्राब्दी सोहळ्याचे उद्घाटन झाले.
२००५: देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापूर येथे सुरु झाला.
• मृत्यू :
• १९८१: रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे पहिले भारतीय प्राचार्य गो. रा. परांजपे यांचे निधन.
• १९८२: आदर्श लोकप्रतिनिधी पक्षाचे विधानसभेतील पहिले आमदार , खासदार रामभाऊ म्हाळगी यांचे निधन. (जन्म: ९ जुलै, १९२१ )
• १९९९: हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते सतीश वागळे यांचे निधन.
• २०००: कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती नारायण काशिनाथ लेले यांचे निधन.
जन्म :
१८९९: चरित्रकार आणि संपादक शि. ल. करंदीकर यांचा जन्म.
१९६५: शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांचा जन्म.