साखर प्रक्रिया प्रकल्प संचालनासाठी विविध पदांसाठी जम्बो भरती

पुणे : आय.एम.पी. इंजिनिअरिंग अॅण्ड पॉवर प्रा.लि. येथे महाराष्ट्रातील साखर प्रक्रिया प्रकल्प संचालनासाठी पात्र व अनुभवी उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छुक उमेदवारांनी वॉक-इन / ऑनलाईन मुलाखतीसाठी hr@impepl.com आणि hr.corporate@impepl.com या ईमेलवर अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच विशेष सूचना म्हणून अनुसूचित जाती/जमाती व इतर मागासवर्ग उमेदवारांनी संबंधित प्रमाणपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे सोबत आणावीत, असेही कळविले आहे.
भरवयाची पदे खालीलप्रमाणे :
चीफ इंजिनिअर , डेप्यु. चीफ इंजिनिअर आणि चीफ केमिस्ट
(संबंधित विभागातील ३ ते ५ वर्षांचा अनुभव आवश्यक)
सहाय्यक अभियंता , कॅन अनलोडर, मिल फिटर ग्रेड ‘ए’ , रॅक/बॅगेज कॅरिअर ऑपरेटर , बॉयलिंय हाउस फिटर ग्रेड ‘बी’ , सेंट्रीफ्युगल फिटर ग्रेड , रिगर , इलेक्ट्रिकल अभियंता , इलेक्ट्रिशियन, लॅब इनचार्ज, मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट, इलेक्ट्रिशियन, पॅन मॅन , ज्युस सुपरवायझर ,सल्फिटेशन मेट ,डोअर मेट , सेंट्रीफ्युगल ऑपरेटर, ईटीपी प्रभारी, एफटीपी ऑपरेटर, मिल फोरमॅन, फिडर टेबल ऑपरेटर , ट्रिपलर ऑपरेटर , मिल फिटर ग्रेड ‘बी’ , बॉयलिंग हाऊस फिटर ग्रेड ‘अ’, वेल्डर , ऑइल मॅन कम पंप मॅन , बॉयलिंग हाऊस फिटर ग्रेड ‘ए’ , टर्नर, सेंट्रीफ्युगल फिटर ग्रेड ‘बी’, वायरमन ग्रेड ‘ए’, लॅब केमिस्ट, क्वॉड्रपल मेट ,वायरमन ग्रेड ‘ए’, लॅब. केमिस्ट, पॅन इन्चार्ज, सेंट्रीफ्युगल मेट, सहाय्यक पॅन मॅन, ओलिव्हर मेट ,सेंट्रीफ्युगल ऑपरेटर आणि ईटीपी केमिस्ट.
वरील सर्व पदांसाठी संबंधित शाखेतील पदवी / डिप्लोमा व किमान ५ वर्षांचा अनुभव अनिवार्य आहे. साखर उद्योगातील प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.