‘व्यंकटेश शुगर युनिट २’चे रोलर पूजन उत्साहात

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सिल्लोड : दि व्यंकटेश शुगर च्या युनिट 2 खडकपूर्णा ॲग्रो संचालित सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, (माणिकनगर,भवन सिल्लोड ) च्या गळीत हंगाम 2023-24 चा मिल रोलर पूजन समारंभ नुकताच पार पडला.

यावेळी दि व्यंकटेश ग्रुप चे संस्थापक चेअरमन अभिनाथ शिंदे व सौ. अश्विनी शिंदे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून नागेबाबा उद्योग समूहाचे संस्थापक श्री. कडूभाऊ काळे, छत्रपती उद्योग समूहाचे संस्थापक श्री. संतोष नाना भंडारी हे उपस्थित होते.

व्यंकटेश शुगरचे चेअरमन श्री. समाधान डोईफोडे, व्यंकटेश ग्रुपचे सह संस्थापक श्री. अनिल गुंजाळ, श्री. व्यंकट देशमुख, कार्यकारी संचालक श्री. मरकड, खडकपूर्णा ऍग्रोचे जनरल मॅनेजर श्री. विश्वनाथ् बहिर, व्यंकटेश मल्टीस्टेट चे जनरल मॅनेजर श्री. अंबादास पांडे, चिफ इंजि. श्री. लांबे, चिफ केमिस्ट श्री. शिंदे, चिफ अकाउंटंट व फायनान्स हेड श्री. संतोष उन्मेघ , ॲडमिन ऑफिसर श्री. सचिन देशमाने, डेव्ह. ऑफिसर श्री. प्रमोद म्हस्के, प्रशासकीय अधिकारी श्री. साबळे , शेतकी अधिकारी श्री. खेडकर, सुरक्षा अधिकारी श्री. तांगडे , कामगार युनियन अध्यक्ष श्री. रामराव कळम आदींसह विविध खाते प्रमुख, उप खाते प्रमुख , अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »