कुंभी-कासारी कारखाना चौथ्यांदा चंद्रदीप नरके यांच्याकडे

कोल्हापूर : कुडित्रे येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ‘नरके पॅनल’चे सर्व २३ उमेदवार १५०० ते २००० मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. यानंतर चंद्रदीप नरके यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली चौथ्यांदा हे यश मिळाले आहे. गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखालील शाहू आघाडीने शेवटपर्यंत झुंज दिली. परंतु त्यांच्या पॅनेलचा दारूण पराभव झाला.
नरके यांच्या विरोधात आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे यांनी ताकद पणाला लावली होती, तर गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके व त्यांचा मुलगा चेतन नरके यांनी विरोधी आघाडीचा थेट प्रचार केल्याने या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.परंतु अटीतटीच्या लढतीतही चंद्रदीप नरके यांच्याकडे सत्ता कायम राहिली.
चंद्रदीप नरके यांना आमदार सतेज पाटील, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांची ताकद मिळाल्याने ही लढाई सोपी झाली असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. ‘जसं ठरलंय, तसंच केलंय’ अशा आशयाचे फोटो मतदानाच्या दिवशी पासून सोशल मीडियावर फिरत होते. यामुळे पुन्हा एकदा माजी मंत्री सतेज पाटील यांचा ‘आमचं ठरलंय’ पॅटर्न यशस्वी झाले आहे.
नरके पॅनलची एक हाती सत्ता
कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कुडित्रेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रविवारी अत्यंत चुरशीने ८२.४५ टक्के झालेल्या मतदानानंतर, सकाळी मतमोजणीला रमणमळा इथल्या शासकीय धान्य गोदामात सुरवात झाली आणि मतमोजणी रात्री ११ च्या सुमारास संपली. एकूण ३५ टेबलांवर प्रत्येकी ४ कर्मचारी असे एकूण १४० कर्मचारी मतमोजणी करत होते. तर २३ जागांसाठी ५० उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष चंद्रदीप नरके विरुद्ध आ. पी. एन. पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
सतेज पाटील किंगमेकर
कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्यावर गेली १५ वर्षे माजी आमदार चंद्रदीप नरके यांची सत्ता आहे. परंतु यंदाच्या निवडणुकीत आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे यांनी ताकद लावल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. अशातच गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी उघडपणे विरोधी आघाडीस पाठिंबा दिला होता तर त्यांचे पुत्र चेतन नरके थेट प्रचारात उतरत प्रचार सुरू केला होता. गोकुळच्या राजकारणात चंद्रदीप नरके यांनी सतेज पाटील यांना साथ दिली होती. अरुण नरके हे सत्तेत असताना गोकुळ विरोधातील मोर्चात ते पुढे राहिले. त्याची परतफेड म्हणून पाटील यांनी नरके यांना पाठिंबा दिला.
विरोधकांनी केलेल्या आरोपांना कोणतीही भीक न घालता मतदारांनी आपले मतदान नरके यांना देत आपला कौल विजयाच्या माध्यमातून दाखवून दिला. प्रचाराच्या काही दिवसांवरच सतेज पाटील यांनी नरके यांना पाठिंबा दिल्यामुळे सतेज पाटील यांचा “आमचं ठरलंय” पॅटर्न पुन्हा चर्चेत आला आहे.यामुळे सध्या नरके जरी कुंभी कासारी कारखान्याचे किंग ठरले असले तरी सतेज पाटील हे त्यांचे किंगमेकर ठरले आहेत.
नरके गटाचे विजयी उमेदवार:
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
अनिल पाटील, भगवंत पाटील, बाजीराव शेलार, राहुल खाडे, किशोर पाटील, दादासो लाड, उत्तम वरुटे, सर्जेराव हुजरे, विश्वास पाटील, सरदार पाटील, संजय पाटील, अनिष पाटील, प्रकाश पाटील, बळवंत पाटील, वसंत आळवेकर, प्रकाश पाटील, राऊ पाटील, विलास पाटील, धनश्री पाटील, प्रमिला पाटील, युवराज शिंदे, कृष्णात कांबळे.

पहिल्या फेरीत विरोधी राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलचे १८ उमेदवार तर सत्ताधारी नरके पॅनेलचे ५ उमेदवार आघाडीवर राहिले. पहिल्या फेरीत करवीर तालुक्यातील १८ गावांतील ३५ केंद्रांची मतमोजणी झाली. या गावांतून विरोधी पॅनेलला १०० ते ५०० च्या फरकाने आघाडी मिळाली. दुसऱ्या फेरीदरम्यान सत्ताधारी नरके गटाने विरोधी पॅनेलचे मताधिक्य तोडून आघाडी घेण्यास सुरुवात केली.
कुंभी कारखान्यासाठी रविवारी अत्यंत चुरशीने ८२.४५ टक्के मतदान झाले. मंगळवारी शासकीय बहुउद्देशीय हॉल रमणमळा येथे ३५ टेबलवर मतमोजणी सुरू झाली. २५ व ५० चे गट्टे करत साडेनऊच्या सुमारास प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीतील उत्पादक सभासद प्रतिनिधी गट क्र. १ मधील कल विरोधी पॅनेलच्या बाजूने राहिला.
कारखाना परिसरातील निर्णायक ठरणाऱ्या सांगरुळ, वाकरे, कोगे, पाडळी खुर्द, शिरोली दुमाला या घेतली तर विरोधी पॅनेलने कुडित्रे कोपार्डे, खुपीरे, कसबा बीड या गावांत आघाडी घेतली.
पहिल्या फेरीत समाविष्ट करवीर तालुक्यातील १८ गावांतील मतमोजणी झाली. या गावांतून विरोधी पॅनेलला यापूर्वीच्या निकालात लक्षवेधी मताधिक्य असायचे. मात्र यावेळी विरोधी पॅनेलला उमेदवारनिहाय सुमारे १०० ते ५००च्या दरम्यान मताधिक्य राहिले.
विरोधी पॅनेलकडून या फेरीत एक हजार ते पंधराशेपर्यंतचे मताधिक्य मिळेल, असा अंदाज बांधला गेला होता. मात्र प्रत्यक्षात त्यामध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाले. सायंकाळी ६ वाजता दुसऱ्या फेरीमध्ये करवीर तालुक्यातील १३ आणि पन्हाळा तालुक्यातील ५ गावांच्या ३५ केंद्रांच्या मतमोजणीला प्रारंभ झाला. विरोधी पॅनेलला मिळालेले पहिल्या फेरीतील १०० ते ५०० चे मताधिक्य तोडून नरके पॅनेलचे बहुतांश उमेदवार दुसऱ्या फेरीत सुमारे ३०० मतांच्या फरकाने आघाडीवर राहिले.
पहिल्या फेरीअखेर विरोधी पॅनेलचे राजेंद्र सूर्यवंशी यांना ३ हजार ९०० एवढी सर्वाधिक मते मिळाली. आजवरच्या कुंभी कारखान्याच्या बाल्लेकिल्ला असलेल्या या गावांतून निवडणुकीत जुन्या सांगरुळ हे मताधिक्य या निवडणुकीतही का विधानसभा मतदारसंघातील राहील, किंबहुना यामध्ये वाढच गावांमध्ये विरोधी पॅनेलला मोठे होईल, असा अंदाज व्यक्त करीत मताधिक्य राहिले होते. काँग्रेसचा विरोधी पॅनेलकडून विजयाचे गणित मांडले जात होते. झाल्याचे पहिल्या फेरीअखेर दिसून मात्र अपेक्षेपेक्षा या मताधिक्यात घट आले.
नरके पॅनेल विरुद्ध कुंभी बचाव
कुंभी-कासारी साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके, आ. सतेज पाटील, आ. जयंत आसगावकर, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, अजित नरके यांनी सत्तारूढ आघाडीचे नेतृत्व केले; तर विरोधी राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलचे नेतृत्व आ. पी. एन. पाटील, चंद्रदीप नरके यांचे चुलते अरुण नरके, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे व चेतन नरके यांनी नेतृत्व केले.
शिवाजी पेठेत जल्लोष
सत्तारूढ आघाडीचे चंद्रदीप नरके आणि विरोधी आघाडीचे अरुण नरके शिवाजी पेठेत एकाच इमारतीत राहतात. नरके वाड्यात कही खुशी, कही गम असे वातावरण होते. चंद्रदीप नरके यांच्या समर्थकांनी नरके पॅनेल आघाडी घेताच शिवाजी पेठेत जल्लोष केला. गुलालाची उधळून करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.