पारनेर साखर कारखान्याच्या पुनर्जीवनासाठी विखे यांची भेट

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नगर – पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या पुनर्जीवनासाठी कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली.

यावेळी गेल्या 18 वर्षांपासुन अवसायनात असलेल्या या सहकारी साखर कारखान्याचे पुनर्जीवन होण्यासाठी आता पोषक परिस्थिती असल्याबाबतचा प्रस्ताव मंत्री विखेंना देण्यात आला.

तसेच याबाबत कारखान्याविषयी उच्च न्यायालयात चालू असलेल्या विविध खटल्यांची माहिती, पारनेर साखर कारखान्याच्या सुमारे पंचवीस एकर जमिनीचे बेकायदेशीरपणे केलेल्या हस्तांतरणा विषयी उच्च न्यायालयाचे आदेशानंतर मंत्री विखेंकडे सदर प्रकरण सुनावणीसाठी दाखल केल्याची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »