लहुजी वस्ताद

आज शुक्रवार, फेब्रुवारी १७, २०२३ रोजीचे
पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर माघ २८, शके १९४४
सूर्योदय : ०७:०६ सूर्यास्त : १८:३९
चंद्रोदय : ०५:२४, फेब्रुवारी १८ चंद्रास्त : १५:२९
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
उत्तरायण
ऋतू : शिशिर
चंद्र माह : माघ
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : द्वादशी – २३:३६ पर्यंत
नक्षत्र : पूर्वाषाढा – २०:२८ पर्यंत
योग : सिद्धि – २३:४५ पर्यंत
करण : कौलव – १३:१५ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – २३:३६ पर्यंत
सूर्य राशि : कुंभ
चंद्र राशि : धनु – ०१:४८, फेब्रुवारी १८ पर्यंत
राहुकाल : ११:२६ ते १२:५३
गुलिक काल : ०८:३३ ते ०९:५९
यमगण्ड : १५:४६ ते १७:१३
अभिजित मुहूर्त : १२:२९ ते १३:१६
दुर्मुहूर्त : ०९:२५ ते १०:११
दुर्मुहूर्त : १३:१६ ते १४:०२
अमृत काल : १६:०९ ते १७:३५
वर्ज्य : ०७:३१ ते ०८:५७
वर्ज्य : ०३:३३, फेब्रुवारी १८ ते ०४:५८, फेब्रुवारी १८
लहुजी वस्ताद– भारतमातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणीच लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत ‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांची समाधी उभारली.
आपल्या वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहुजींना असह्य झाला. पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांवर मात करण्यासाठी म्हणजे पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते सुरू केले.
या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, उमाजी नाईक, फुले यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हेदेखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.
७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला. अवघ्या तेरा महिन्यांनी म्हणजेच १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला. क्रांतिवीर लहुजी साळवेंच्या समाधी संगमवाडी (पुणे) येथे आहे.
• १८८१: क्रांतीवीर, समाजसेवक लहुजी राघोजी साळवे ऊर्फ लहुजी वस्ताद यांचे निधन.
• १८८३: राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १८४५)
घटना :
१८०१: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखीच मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह् ने जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष तर बर यांना उपाध्यक्ष केले.
१९२७: रणदुंदुभि नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९३३: अमेरिकेत दारुबंदी समाप्त झाली. १९२० साली ही दारुबंदी लागू झाली होती.
१९६४: अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला.
२००८: कोसोव्हो देशाने स्वातंत्र्य जाहीर केले.
• मृत्यू :
१६००: सूर्याभोवती पृथ्वी फिरते. सूर्यासारखे अनेक तारे आहेत. त्यांच्याभोवती पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत आणि त्यांच्यावर सजीवसृष्टी असू शकते, असे मत मांडणार्या जिओर्डानो ब्रुनो यांना बायबल विरोधी मत मांडल्याबद्दल क्रूसावर बांधून जाळण्यात आले.
• १९७८: कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १९१०)
• १९८६: भारतीय तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचे निधन. (जन्म: १२ मे १८९५)
• १९८८: बिहारचे ११ वे मुख्यमंत्री कापुरी ठाकूर यांचे निधन. (जन्म: २४ जानेवारी १९२४)
• १९९३ : पद्मभूषण पुरस्कार सन्मानित स्वातंत्र्य सेनानी राणी गाइदिन्ल्यू यांचे निधन ( जन्म : २६ जानेवारी, १९१५)