हलक्या जमिनीत सातत्याने एकरी शंभर टन ऊस उत्पादन

वडगावचे प्रयोगशील तरुण शेतकरी मेमाणे यांचे लक्ष्य आता सव्वाशे टनांचे
पुणे : अत्यंत हलक्या, फुटभर खोलीला मुरूम लागणाऱ्या जमिनीत एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेण्याचा चमत्कार प्रयोगशील शेतकरी राजेंद्र मेमाणे यांनी करून दाखवला आहे. सलग तीन वर्षे ते शंभर टन ऊस उत्पादन घेत आहेत.
विशेष म्हणजे ते उच्चशिक्षित वगैरे नसून, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ऊस शेती करत आहेत. ‘शुगरटुडे’ने (Sugartoday.in magazine) नुकतीच त्यांच्या शेतात जाऊन मुलाखत घेतली. खूप कमी बोलणारे, अत्यंत साधी जीवनशैली असणारे, शेतात काम करताना पादत्राणे न वापरणारे, शेतीत सातत्याने नवे प्रयोग करणारे, अशी त्यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत.
८६०३२ वाण आणि त्याची निवड, एकरी शंभर टनांचा प्रवास आदीं मुद्यांवर ते बोलले.
त्यांची सविस्तर मुलाखत पाहण्यासाठी खालील युट्यूब लिंकवर टिचकी मारा.