महादेवी वर्मा
आज रविवार, मार्च २६, २०२३ रोजीचे
पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२५
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर चैत्र ०५, शके १९४५
सूर्योदय : ०६:३८ सूर्यास्त : १८:५१
चंद्रोदय : ०९:४९ चंद्रास्त : २३:२७
शक सम्वत : १९४५
संवत्सर : शोभन
उत्तरायण
ऋतू : वसंत
चंद्र माह : चैत्र
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : पञ्चमी – १६:३२ पर्यंत
नक्षत्र : कृत्तिका – १४:०१ पर्यंत
योग : प्रीति – २३:३३ पर्यंत
करण : बालव – १६:३२ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – ०४:५४, मार्च २७ पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : वृषभ
राहुकाल : १७:१९ ते १८:५१
गुलिक काल : १५:४८ ते १७:१९
यमगण्ड : १२:४४ ते १४:१६
अभिजित मुहूर्त : १२:२० ते १३:०९
दुर्मुहूर्त : १७:१३ ते १८:०२
अमृत काल : ११:३३ ते १३:१२
दीप मेरे जल अकम्पित,
धुल अचंचल !
सिन्धु का उच्छ्वास घन है,
तड़ित् तम का विकल मन है,
भीति क्या नभ है व्यथा का
आँसुओं से सिक्त अंचल ! – महादेवी वर्मा
महादेवी वर्मा ह्या १९१९मधे अलाहाबादमधल्या क्रास्थवेट कॉलेजात प्रवेश घेऊन हुशार व मेधावी विद्यार्थिनीच्या रूपात पुढे जात जात त्या १९३२मधे अलाहाबाद विश्वविद्यालयातून संस्कृत विषयात एम.ए. झाल्या. अत्यंत प्रतिभावान कवयित्री होत्या. त्यांना हिंदी साहित्य जगतातील छायावादी युगाच्या चार प्रमुख स्तंभांपैकी एक समजले जाते. आधुनिक हिंदीच्या समर्थ कवीं असल्यामुळे त्यांना ‘आधुनिक मीरा’ पण म्हंटले जाते. कवी निराला ह्यांनी तर त्यांचा हिंदीच्या विशाल मंदिरातील सरस्वती असा उल्लेख केला आहे.
अलाहाबादच्या प्रयाग महिला विद्यापीठाच्या विकासकार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. त्या काळात हे काम म्हणजे महिला क्षेत्रात क्रांती घडविणारे पाऊल होते. ह्या विद्यापीठाच्या त्या प्रधानाचार्य व कुलगुरू पण होत्या. १९३२मध्ये त्यांनी चाँद नावाच्या एका महिलांच्या मासिकाच्या मुख्य संपादक झाल्या. तिभावान कवयित्री व गद्य लेखिका महादेवी वर्मा संगीतातपण निपुण होत्या. त्याचबरोबर कुशल चित्रकार व सृजनात्मक अनुवादक पण होत्या. त्यांना हिंदी साहित्यातील सगळ्याच मोठ्या पुरस्कारांनी गौरविले गेले होते.
भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १९५२ मधे उत्तर प्रदेश विधान परिषदेत त्यांना सदस्य बनविले. १९५६ मधे भारत सरकारने त्यांच्या साहित्यिक सेवेसाठी त्यांना पद्मभूषण ही उपाधी दिली.. १९७९ मधे त्या साहित्य ॲकॅडमीच्या पहिल्या महिला सदस्य होत. भारत सरकार कडून १९८८ मधे त्यांना मरणोपरान्त पद्मविभूषण देऊन भूषविले.
१९६८ मधे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते मृणाल सेन ह्यांनी त्यांच्या स्मरणार्थ ‘वह चीनी भाई’ वर ‘नील आकाशेर नीचे’ नामक एक बंगाली चित्रपटाची निर्मिती केली. १६ सप्टेंबर १९९१ ला भारत सरकारने महादेवी वर्मांच्या सन्मानार्थ जयशंकर प्रसादांसमवेत २ रुपयांचे एक पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले. त्यांच्या अतीत के चलचित्र या पुस्तकाचा मराठी अनुवाद’ ’बिंदा, सांबिया आणि… ’या नावाने प्रकाशित झाला आहे. त्या भारतामधील ५० यशस्वी महिलांमधील एक होत. ‘यामा’ नामक काव्य संकलनासाठी त्यांना भारत सरकार चा सर्वोच्च सन्मान ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ देण्यात आला.
१९०७: पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ महादेवी वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९८७)
घटना :
१५५२: गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले.
१९०२: नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले.
१९१०: लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली.
१९४२: ऑस्विच येथील छळछावणीत (CONCENTRATION CAMP) पहिली महिला कैदी दाखल झाली.
१९७२: नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.
१९७४: गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपको आंदोलनाची सुरूवात.
१९७९: अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.) येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या.
• मृत्यू :
• १९९६: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित चित्रकार कटिंगेरी कृष्णा हेब्बार (के. के. हेब्बर )यांचे निधन. (जन्म : १५ जून, १९११)
• १९९७: गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर, १९१०)
• १९९९: प्रयोगशील संगीतकार आनंद शंकर यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर, १९४२)
• २००३: गुजरातचे मंत्री हरेन पंड्या यांची हत्या.
• २००८: दलित साहित्यिक बाबुराव बागूल यांचे निधन. (जन्म: १७ जुलै , १९३०)
• २०१२: प्रसिद्ध पराङमुख गीतकार व कवी माणिकराव गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचे निधन. (जन्म: १० मे, १९३७)
जन्म
१९०९: साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतक चे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर, २०००)