गळीत हंगाम संपल्यात जमा, अवघे सहा कारखाने सुरू

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : यंदाचा ऊस गळीत हंगाम (२०२२-२३) आता संपल्यात जमा आहे. कारण साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या ताज्या पत्रकात अवघे सहा कारखाने सुरू असल्याचे म्हटले आहे. पुढील आठवड्यात संपूर्ण हंगामाची सविस्तर माहिती जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

कमी काळाचा गळीत हंगाम म्हणून यंदाच्या हंगामाची नोंद होईल. सुमारे दोनशेवर खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांना गळिताचे परवाने मिळाले होते. त्यातील अवघे सहा कारखाने परवाच्या आकडेवारीनुसार सुरू आहेत. त्यांचेही गळीत अखेरच्या टप्प्यात आहे.

एकूण परवाने २०९

गाळप समाप्त २०३

अद्याप सुरू कारखाने – ६

यादी

सुरू कारखाने (१०-०४-२०२३ नुसार)

अ. क्र.जिल्हासाखर कारखान्याचे नाव सहकारी / खासगीदै.गाळप क्षमता (मे.टन)
1साताराअजिक्यतारा ससाका जि. शाहुनगर पो. शेंद्रे ता. सातारा सहकारी4500
2सोलापूरश्री. सिध्देश्वर ससाका जि. कु मठे, ता. उत्तर सोलापूर सहकारी7500
3उस्मानाबादनॅचरल शुगर ॲन्ड अलाईड इंडस्ट्रीज, रांजणी ता. कळांब खासगी5000
4जालनाकर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ ससाका अंकुशनगर, ता. अंबड सहकारी4000
5जालनासागर ससाका  (कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ ससाका जि. युनिट-2) सहकारी2500
6बीडसुंदरराव सोळंके ससाका, सुंदरनगर – तळेगाव, ता. माजलगाव सहकारी5000
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »