माळेगाव निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप : जिल्हा बँक रात्री ११ पर्यंत उघडी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाकडून पैशाचा वारेमाप वापर होत असून, त्यासाठी पुणे जिल्हा बँकेची बारामती येथील एक शाखा रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होती आणि तेथे माळेगाव कारखान्याच्या मतदार याद्या सापडल्या, असा गंभीर आरोप सहकार बचाव पॅनलने केला आहे.

रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार बचाव पॅनल’चे कार्यकर्ते बँकेत पोहोचले आणि तेथे काय चालले आहे याची माहिती घेतली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनील मुसळे बँकेत उपस्थित होते, तसेच क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकारीही तिथे होते, असा दावा रंजन तावरे यांनी केल्याने बारामतीतील राजकीय वातावरण तापलं आहे.

तावरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मुसळे रात्री 11 वाजता बँकेत काय करत होते? येथे सदस्यांची, त्यांच्या नातेवाईकांची आणि जबाबदारी स्वीकारणाऱ्यांची यादी सापडली. जलसिंचन विभागाचे अधिकारी डुबल यांचे नावही यामध्ये आहे. त्यांनी पाणी वाटप संस्थांवर दबाव टाकून मदत करण्यास भाग पाडले जात आहे. .अजित पवार यांच्याकडून शासकीय यंत्रणेचा गैरवापर होत आहे, असा आरोपही तावरे यांनी केला.

दरम्यान, पुणे जिल्हा बँकेचे सहव्यवस्थापक जगदाळे यांनी खुलासा करताना, तावरे यांचे आरोप फेटाळले. ते म्हणाले, “बँक साडेपाच वाजता बंद होते. नंतर फोन आल्यामुळे मी पुन्हा बँकेत आलो. संगणकीय काम सुरू असल्यामुळे काही कर्मचारी उशिरा थांबले होते. मात्र, माळेगाव कारखान्याच्या मतदार याद्या बँकेत कशा आल्या हे मला माहीत नाही.”बारामती शहरातील आमराई परिसरातील पीडीसीसी बँकेची शाखा रात्री अकरा वाजता देखील उघडी होती, अशी विरोधकांची तक्रार आहे. या बँकेतून पैसे वाटप होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »