मांजरा कारखान्यात साडेनऊ लाख पोती साखर उत्पादन

लातूर – येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगाम २०२२-२३ मधील उत्पादित नऊ लाख ५१ हजार व्या साखर पोत्याचे पूजन माजीमंत्री तथा कारखान्याचे अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे, संत शिरोमणी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शाम भोसले, रेणाचे संचालक संभाजी रेड्डी, संभाजी सूळ, सचिन दाताळ, सतीश पाटील, कारखान्याचे संचालक अशोक काळे, तात्यासाहेब देशमुख, वसंत उफाडे, बंकटराव कदम, श्रीनिवास देशमुख, सदाशिव कदम, अनिल दरकसे, धनराज दाताळ, बाबुराव जाधव आदी उपस्थित होते.