नव्या साखर आयुक्तांनी पदभार स्वीकारला

पुणे : राज्याचे नवे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी ८ ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारला. त्यांचे साखर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी स्वागत केले.
डॉ. कोलते यांची कालच साखर आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्यांनी दुसऱ्याच दिवशी पुण्यात येऊन पदभार स्वीकारत कामकाजाला सुरुवात केली. ऊस गळीत हंगाम २०२५-२६ तोंडावर आल्याने डॉ. कोलते यांनी कसलाही विलंब न करता, तातडीने साखर आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. आगामी गळीत हंगाम अधिक चांगल्या पद्धतीने कसा पार पडेल, याला आपले प्राधान्य राहील, असे त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्पष्ट केले.
सध्या तब्बल २१२ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम परवानगीसाठी अर्ज केले आहेत. त्यात ११५ खासगी आणि ९७ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. परवान्यांचा विषय त्वरेने मार्गी लावण्याचे पहिले काम नव्या साखर आयुक्तांना करावे लागणार आहे.
‘शुगरटुडे’ मासिकाच्या डॉ. संजय कोलते यांना खूप साऱ्या शुभेच्छाः
Many many best wishes to dr. Kolte saheb.