२5 फेब्रुवारीचा गुळ बाजार बंद स्थगित

पुणे : मार्केट यार्डातील गुळ भूसार विभागातील सभासदांच्या विविध प्रलंबित मागण्या व वाढत्या समस्यांकडे बाजार समितीचे तसेच राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप दि पूना मर्चेंटस् चेंबरचे पुकारला होता.
सदर समस्यांबाबत मा. पणन संचालक यांनी दि पूना मर्चेंटस् चेंबर व कृषी उत्पन्न बाजार समिती यांची एक संयुक्त सभा गुरुवार दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित केली असल्यामुळे सदरचा बंद स्थगित करण्यात आला आहे.
मार्केट यार्ड गुळ भूसार विभागातील वाढत्या समस्यांमुळे आमच्या सभासदांमध्ये तीव्र नाराजी आहे. सदर मिटिंगमधून काही समाधानकार मार्ग न निघाल्यास सभासदांची सभा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती दि पूना मर्चेंटस् चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली.






