हुतात्मा साखर कारखान्यामध्ये भरती

सांगली : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्यामध्ये साखर व आसवणी प्रकल्पासाठी खालील जागा त्वरित भरावयाच्या आहेत. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत दैनिक गाळप क्षमता ५००० मे. टन साखर कारखाना व ३० केएलपीडी डिस्टीलरी प्रकल्पामधील सदर पदावरील काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे. तरी पात्र उमेदवारांनी अर्जावर स्वतःचा आयकार्ड साईज फोटो, पुर्ण नांव, पत्ता, पदाचे नांव, मोबाईल नंबर, जन्म तारीख, शैक्षणिक पात्रता, शाळा सोडलेचा दाखला, सध्याचा पगार, अपेक्षित पगार, पुर्वानुभव दाखल्याचे सत्यप्रतीसह जाहिरात प्रसिध्द झालेपासून १० दिवसाचे आत अर्ज पोष्टाने, समक्ष अगर ईमेल द्वारे कारखान्याकडे पोहोच करावेत, असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
टीप : (मागासवर्गीय पात्र उमेदवारांना प्राधान्य देणेत येईल)
पत्ता : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना लि., नागनाथअण्णानगर वाळवे, ता. वाळवा, जि. सांगली (महाराष्ट्र) पिन – ४१६३१३
ई-मेल: hutatmassk@gmail.com
पदांचा तपशील खालीलप्रमाणे
१. सिव्हील इंजिनिअर (१)
शैक्षणिक पात्रता व अनुभव – D.C.E./B.E.(Civil) संगणक ज्ञान व नवीन कारखाना उभारणीसह सदर पदावरील कामाचा १० वर्षाचाअनुभव आवश्यक
२. इलेक्ट्रीक इंजिनिअर (१)
शैक्षणिक पात्रता – D.E.E./B.E.(Ele) संगणक ज्ञान व सदर पदावरील कामाचा ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
३. मॅकेनिकल ड्रॉप्समन (१)
शैक्षणिक पात्रता व अनुभव – I.T.I./D.M.E. ड्रॉप्समन, अॅटोकॅड, संगणक ज्ञान व सदर पदावरील कामाचा ५ वर्षाचाअनुभव आवश्यक
४. गोडावून किपर (१)
शैक्षणिक पात्रता व अनुभव – कोणत्याही शाखेचा पदवीधर संगणक ज्ञान व सदर पदावरील कामाचा ५ वर्षाचाअनुभव आवश्यक



