श्री संत कुर्मदास कारखान्यात भरती

सोलापूर : प्रतिदिनी १२५० मे.टन गाळप क्षमतेच्या श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्यामध्ये खालील रिक्त पदे भरावयाची असून, अनुभवी व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सविस्तर माहितीसह त्वरीत ssksugar@gmail.com या ई मेलद्वारे पाठविण्यात यावेत, असे आवाहन कारखान प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
पत्ता ः श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना लि, सहकार महर्षी गणपतराव साठेनगर, पडसाळी, ता. माढा, जि. सोलापूर-४१३२०८
पदांचा तपशील खालीलप्रमाणे
१. ई.डी.पी. मॅनेजर ( ०१)
शैक्षणिक पात्रता – बी.सी.ए/एम.सी.ए./बी.ई. कॉम्प्युटर, व्ही.एस. आय.ई. आर.पी तसेच सदर पदाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक
२. असि. सिव्हील सुपरवायझर (०१)
शैक्षणिक पात्रता – डिप्लोमा इन सिव्हील / कृषी पदविका/पदवीधर, संगणक ज्ञान आवश्यक
३. सुरक्षा अधिकारी (०१)
पात्रता – माजी सैनिक / साखर कारखान्यातील सदर पदाचा ५ वर्षाचा अनुभव
टीप ः अनुसुचित जाती/जमाती, भटक्या विमुक्त जाती/जमाती, इतर मागास प्रवर्गातील पात्र उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. मुलाखतीची तारीख व वेळ नंतर कळविण्यात येईल, याची संबंधित उमदवारांनी नोंद घ्यावी.



