राजारामबापू पाटील साखर कारखान्यात विविध पदांसाठी भरती

सांगली : राज्यातील अग्रगण्य आयएसओ ९००१-२०१५ प्रमाणित उत्कृष्ट व्यवस्थापनाखाली कार्यरत असणाऱ्या राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना लि., राजारामनगर पो. साखराळे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथील साखराळे युनिट नं. १, वाटेगाव सुरुल युनिट नं. २ व तिप्पेहळ्ळी जत युनिट नं.४ मध्ये खालीलप्रमाणे विविध पदांसाठी जागा त्वरित भरावयाच्या आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता, अनुभव, पगार इ. प्रमाणपत्रासह आपले अर्ज वरील पत्त्यावर जाहिरात प्रसिध्द झालेपासून १० दिवसांचे आत पोहोचतील, अशा रीतीने पाठवावेत, असे आवाहन कारखाना प्रशानसनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पदांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे…
साखराळे युनिट नं. १
१. मटेरियल मॅनेजर (जागा १)
शैक्षणिक पात्रता : बी.ई (मेकॅ.) / एम.बी.ए./ डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेंट कोर्स पास तसेच मटेरियल मॅनेजर म्हणून प्रत्यक्ष काम केल्याचा साखर कारखाना / इंजिनिअरिंग इंडस्ट्रीतला अनुभव आवश्यक.
२. सिव्हिल इंजिनिअर (जागा १)
शैक्षणिक पात्रता : बी.ई. सिव्हिल, तसेच सिव्हिल इंजिनिअर म्हणून प्रत्यक्ष काम केल्याचा साखर कारखान्यातील अनुभव आवश्यक.
३. ऊस विकास अधिकारी (जागा १)
शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. / बी.एस्सी. अॅग्री, स्वतंत्रपणे ऊस विकास योजना राबविणे, ऊस पीक मार्गदर्शन, ऊस उत्पादनाची उद्दिष्टपूर्ती करणे, गांडूळ खत प्रकल्प चालविणे, माती व पाणी परीक्षण लॅबबाबतची माहिती तसेच सेंद्रिय व जैविक खत उत्पादनाबाबतचे सखोल ज्ञान व संगणकीय ज्ञान असणे आवश्यक.
४. इलेक्ट्रिक इंजिनिअर (जागा १)
शैक्षणिक पात्रता : बी. ई. इलेक्ट्रिक परीक्षा पास, कारखान्यातील डी.सी. व ए.सी. ड्राईव्ह इत्यादी कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
५. पर्चेस असिस्टंट (जागा २)
शैक्षणिक पात्रता : बी.ई (मेकॅ.) / डी.एम.ई., एम.बी.ए. (मटेरियल मॅनेजमेंट) असलेस प्राधान्य, तसेच पर्चेस असिस्टंट म्हणून प्रत्यक्ष काम केल्याचा साखर कारखाना / इंजिनिअरिंग इंडस्ट्रीतला अनुभव आवश्यक.
वाटेगाव सुरुल युनिट नं. २
६. वायरमन -ए (जागा २)
शैक्षणिक पात्रता : आय. टी. आय. वायरमन कोर्स पास व लायसन्स असणे आवश्यक.
तिप्पेहळ्ळी जत युनिट नं. ४
७. चिफ इंजिनिअर (जागा १)
शैक्षणिक पात्रता : बी.ई. (मेक) बॉयलर प्रोफेसियन्सी परीक्षा पास, सहवीज निर्मिती प्लांटकडील व हायप्रेशर बॉयलर कडील कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
८. सुरक्षा अधिकारी (जागा १)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर, एक्स आर्मी उमेदवारास प्राधान्य देणेत येईल, कारखाना व कॉलनी परिसरातील सुरक्षिततेचे संपूर्ण ज्ञान, शासकीय कार्यालय व संबंधित कामकाजाचा अनुभव आवश्यक,
टीप : १) अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जमाती व इतर मागासवर्गीय पात्र उमेदवारांना प्राधान्य. २) वरील पदाकरिता उमेदवारांचे वय ३५ ते ४५ वर्षे असणे आवश्यक आहे. ३) ७५०० मे. टन क्षमतेच्या साखर कारखान्यात किमान ५ ते ७ प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक. ४) यापूर्वी वरील पदासाठी अर्ज केला असल्यास पुन्हा अर्ज करू नये. ५) उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.