शेणापासून सीबीजी, रिग्रीन एक्सेल उभारणार बोलिव्हियात प्रकल्प

पुणे : साखर उद्योग आणि पूरक क्षेत्रातील इंजिनिअरिंग कंपनी REGREEN-EXCEL ला विदेशात मोठा प्रकल्प उभारण्याची जबाबदारी मिळाली असून, गायीच्या शेणापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) बनवण्याचाही त्यात समावेश आहे.
यासंदर्भात एक प्रेस रिलीज जारी करून REGREEN-EXCEL ने याबाबत माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, REGREEN-EXCEL ने एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय टर्नकी प्रकल्प मिळवला आहे! या प्रकल्पांतर्गत 100 KLPD धान्याधारित ENA/इथेनॉल डिस्टिलरी तसेच गायीच्या शेणापासून / जैविक कचऱ्यापासून तयार होणाऱ्या CBG (कॉम्प्रेस्ड बायोगॅस) प्लांट ची स्थापना NiveSal Pte. Ltd., बोलिव्हिया येथे केली जाणार आहे! हा ऐतिहासिक टप्पा आमच्या जागतिक विस्तारातील एक मोठी झेप दर्शवतो आणि आमच्या नाविन्यपूर्ण, शाश्वत व भविष्यातील तंत्रज्ञानावर जगभराचा वाढता विश्वास अधोरेखित करतो.
या प्रकल्पाची खासियत म्हणजे REGREEN-EXCEL च्या अंतर्गत विकसित केलेल्या तंत्रज्ञानांचा सुरेख संगम आहे, तसेच हा प्रकल्प हरित अभियांत्रिकी व नावीन्यपूर्ण शाश्वततेबाबत आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे आणि “मेक इन इंडिया” तंत्रज्ञानाचा जागतिक स्तरावर सकारात्मक प्रभाव निर्माण करत असल्याचे हे प्रतीक आहे, असेही त्यात पुढे नमूद केले आहे.