‘सहकार शिरोमणी’ च्या २१ जागांसाठी २६८ उमेदवारी अर्ज

पंढरपूर: सहकार शिरोमणी साखर कारखाना निवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी २४२ जणांनी विक्रमी २६८ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
सहकार शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी कल्याणराव काळे यांच्यासमोर अभिजित पाटील व दीपक पवार यांनी आव्हान उभे केले आहे. पाटील, पवार यांच्या युतीची घोषणा झाली नसली तरी ते काळे यांच्या विरोधात एकत्रित लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
कारखान्याच्या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांना सहकार शिरोमणी व विठ्ठल कारखान्याशी निगडित विविध संस्थांकडून दाखले देताना अडवणूक होत असल्याचा आरोप दोन्ही गटांकडून होत आहे
२४२ जणांनी भरले २६८ अर्ज..
भाळवणी ५३, भंडीशेगाव ४४, कासेगाव २६, सरकोली ३३, गादेगाव ३२, सहकारी संस्था २, अनुसूचित जाती जमाती १०, महिला राखीव ३९, इतर मागास प्रवर्ग ११, भटक्या विमुक्त जाती जमाती १८ आदी विक्रमी २६८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.