अभिजित पाटील गटाचे जोरदार शक्तिप्रदर्शन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

‘सहकार शिरोमणी’ निवडणूक

पंढरपूर: सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याची निवडणूक लढविण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगितले आहे. निवडणुकीत आमचे पॅनल उभे असणार आहे. माझ्यावर कोणताही दबाव नाही, असे विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी स्पष्ट केले.

१८ मे रोजी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी, सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंढरपूर येथून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या गटाच्या उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

‘सहकार शिरोमणी’ साखर कारखाना अडचणीत आहे. कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न आहे. तोडणी वाहतुकीची बिले दिली जात नाहीत. शेतकऱ्यांची बिले दिले जात नाहीत, असे पाटील अर्ज भरण्याच्या प्रक्रियेनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी विरोधकांना एकही जागा देणार नाही, असे जाहीर केले आहे. मुळात त्यांना जागा मागितल्या कुणी, आम्ही तर सर्वा लढविणार आहोत, असेही अभिजित पाटील म्हणाले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »