एकरी १०० टनांहून अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव

ओझर येथे आयोजित १३ व्या राज्यस्तरीय ऊस परिषदेची सांगता
पुणे । शुगरटुडे
महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या वतीने ओझर येथे आयोजित १३ व्या राज्यस्तरीय परिषदेत एकरी शंभर टनांहून अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या तेरा शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊस विभाग मजबूत करावा, असे आवाहन संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष अतुलनाना माने पाटील यांनी यावेळी केले.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी किरणभाऊ चव्हाण होते, प्रास्ताविक उत्तमराव जाधव यांनी केले.
संघटनेच्या राज्यस्तरीय संचालक मंडळाच्या यांच्या हस्ते या शेतकऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच तसेच ऊस संजीवनीचे जनक संजीव माने यांनी ‘एकरी शंभर टन उत्सव उत्पादन सहज शक्य’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
अनंतराव निकम यांनी साखर कारखान्याचे कृषी विकास विभागाने कशा पद्धतीने काम केले पाहिजे, यावर मार्गदर्शन केले, महेंद्र घाडगे यांनी ऊस पिकातील खत व्यवस्थापन याविषयी चर्चा केली आणि सुरेश मगदूम यांनी ऊस पिकासाठी ठिबक सिंचन काळाची गरज याविषयी सखोल मार्गदर्शन केले
संचालक मंडळाचे सदस्य व सभासद, अजिंक्य भोसले, गणेश सस्ते पाटील, संतोष माळी, वसंतराव शिंदे, श्यामकांत पाटील, उत्तमराव जाधव, अशोक ढोकले अंबादास हांडे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
ही ऊस परिषद यशस्वी करण्यासाठी जुन्नर तालुका पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. संतोष काळे पाटील, संपत मामा चिंचवडे, संपतराव कोरडे, जितेंद्र, बाळाजी भोर,, बालाजी हांडे, जगन्नाथ रवळे, चंद्रसेन जगदाळे, सुनील मोरे, राजेंद्र खैरे, नितीन तट्टू आदींनी उपस्थिती होती..
यावेळी ऊस विकासासाठी कार्य करणाऱ्या नऊ ऊस मार्गदर्शकांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्रातील साखर कारखान्याने विकास विभाग मार्फत प्रभावीपणे तंत्रज्ञान प्रचार व प्रसार कार्यक्रम राबवावा. तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन घेण्यात नेहमीच आघाडीवर राहतो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,” असे माने पाटील म्हणाले.
कमी पाऊस आणि त्याचा ऊस उत्पादनावर होणारा परिणाम यामुळे महाराष्ट्रात नव्हे तर देशासाठी आगामी दोन ऊस गाळप हंगाम कसोटीचे ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. केंद्र व राज्य शासनाने आतापासूनच नियोजन करुन काही पूरक धोरणे निश्चित करण्याची गरज निर्माण झाली आहे., असेही ते म्हणाले.
.जुन्नर तालुकाध्यक्ष संतोष काळे पाटील यांनी आभार मानले .






