ऊस उत्पादकांना ‘ओंकार’कडून प्रतिटन ४,०५० रुपये

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कडेगाव : रायगाव शुगर अँड पॉवर लिमिटेडशी संलग्न ओंकार साखर कारखाना (युनिट क्र. १६, रायगाव) यांच्यातर्फे २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३,८५० रुपयांचा पहिला हप्ता जाहीर करण्यात आला आहे.

पुढील दिवाळीपर्यंत प्रतिटन आणखी २०० रुपये देण्याचा निर्णय घेतल्याने एकूण दर ४,०५० रुपये होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब बोत्रे-पाटील यांनी दिली.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित आणि कारखान्याचा सर्वांगीण विकास या उद्देशाने हा दर जाहीर केल्याचे बोत्रे-पाटील यांनी सांगितले. वेळेत ऊस बिल अदा केल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होईल आणि त्यांचा विश्वास वाढेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

इतर कारखान्यांपेक्षा जादा दर देण्याचा दावा

चालू गळीत हंगामात जिल्ह्यातील इतर कारखाने अंतिम ऊसदर जाहीर करतील, त्यापेक्षा ओंकार साखर कारखाना अधिक दर देईल, अशी ग्वाही बोत्रे-पाटील यांनी दिली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »