शेट्टी, जानकर यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगरमध्ये आक्रोश मोर्चा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अहिल्यानगर । शुगरटुडे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी व रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली ऊस दरासंदर्भात आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वपक्षीय कारखानदार एकत्रित येवून सर्व गट-तट , मतभेद विसरून पहिली उचल ३००० ते ३१०० रूपये जाहीर केले आहेत. जिल्ह्यातील २१ कारखान्यापैकी ११ साखर कारखान्यांची सरासरी रिकव्हरी ११.२५ टक्के आहे. तर उर्वरीत १० कारखाने १० ते १०.७५ टक्क्यांपर्यंत आहेत, असा दावा शेट्टी यांनी केला आहे.

यावर्षी अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी पहिली उचल ३६०० रूपये देण्याची मागणी करण्यात आली आहे. साखर कारखानदार गेल्या महिन्याभरापासून टोलवाटोलवी करण्यास सुरवात केली आहे, असा आरोपही शेट्टी यांनी केला.

अहिल्यानगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. अहिल्यानगर जिल्ह्यातून खासदार निलेश लंके , आमदार अमोल खताळ पाटील , आमदार विठ्ठल लंघे पाटील , मा. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचेसह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »